IPL 2020 : पंजाब शेर तर राजस्थान सव्वाशेर; ऐतिहासिक विजयाची नोंद!

IPL_RRvsKXIP
IPL_RRvsKXIP

IPL 2020 : RRvsKXIP : शारजा : पंजाब शेर तर राजस्थान सव्वाशेर असा तुफानी सामना रविवारी (ता.27) आयपीएलमध्ये शारजाच्या मैदानावर झाला. पंजाबची 223 ही धावसंख्या राजस्थानने तीन चेंडू राखून पार केली आणि आयपीएलमध्ये इतिहास घडवला. पंजाबच्या मयांक अगरवालची वेगवान शतकी खेळी व्यर्थ ठरली. 

शारजाच्या मैदानावर अपेक्षेप्रमाणे चौकार-षटकारांचा तुफानी पाऊस पडला. दोन्ही संघांकडून एकूण 34 चौकार आणि 19 षटकार मारण्यात आले. मयांक अगरवाल (106) आणि त्याने केएल राहुलसह केलेल्या 183 धावांच्या सलामीच्या जोरावर पंजाबने 223 धावा केल्या होता. राजस्थानने हे आव्हान सहा फलंदाजाच्या मोबदल्यात पार केले. 

हुकमी फलंदाज बटलर लवकर बाद झाल्यावर स्टीव स्मिथ (27 चेंडूत 50) आणि संजू सॅमसन (42 चेंडूत 85) यांनी लढा कायम ठेवत विजय आवाक्‍यात आणला होता, परंतु हे दोघे बाद झाल्यावर सामना पुन्हा पंजाबच्या बाजूने झुकला होता, परंतु तेवाटियाने कॉट्रेलच्या एकाच षटकांत पाच षटकार मारून सामना पुन्हा राजस्थानच्या बाजूने केला. त्यातच जोफ्रा आचर्रने दोन षटका मारुन सामन्याचा निकाल स्पष्ट केला. 

मयांकची तंत्रशुद्ध टोलेबाजी 
मयांक अगरवाल आणि केएल राहुल हे पंजाबचे सलामीवर आलटून पालटून संघाची सूत्रे आपल्या हाती घेत आहेत. पहिल्या सामन्यात मयांक तर दुसऱ्या सामन्यात राहुलने शानदार फलंदाजी केली होती. आज मयांकने जबाबदारी घेतली आणि पहिल्या पासून जबरदस्त प्रहार सुरू केला. त्याच्या फलंदाजीत कोठेही आतताही फटकेबाजी नव्हती. तंत्रशुद्ध फटके असल्यामुळे राजस्थानचे गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षक हतबल झाले होते. 

मयांकच्या हल्यातून श्रेष्ठ गोलंदाज जोफ्रा आचर्रचीही सुटका झाली नाही. मयांक धावांचा पाऊस पाडत असल्यामुळे राहुलने त्याला साथ देण्याची भूमिका बजावली. या दोघांनी तब्बल 183 धावांची सलामी दिली. मयांक आयपीएलमध्ये भारतीयांकडून सर्वात जलद वेगवान शतक करणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला. त्याने 45 चेंडूत आज शतक केले. 
मयांक आणि त्यानंतर केएल राहुल बाद झाल्यावर पंजाबच्या धावांचा वेग काहीसा कमी झाला होता. पण निकोलस पुरनने 8 चेंडूतच 25 धावांची घणाघाती फटकेबाजी केली त्यामुळे पंजाबच्या नावावर 223 धावा झळकल्या. 

संक्षिप्त धावफलक : 

पंजाब : 20 षटकांत 2 बाद 232 (केएल राहुल 69 -54 चेंडू, 7 चौकार, 1 षटकार, मयांक अगरवाल 106 -50 चेंडू, 10 चौकार, 7 षटकार, निकोरस पुरन 25 -8 चेंडू, 1 चौकार, 3 षटकार, राजपूत 39-1) पराभूत वि. 
राजस्थान : 19.3 षटकांत 6 बाद 226 (स्टीव स्मिथ 50 -27 चेंडू, 7 चौकार, 2 षटकार, संजू सॅमसन 85 -42 चेंडू, 4 चौकार, 7 षटकार, राहुल तेवाटिया 53 -31 चेंडू, 7 षटकार, जोफ्रा आर्चर नाबाद 13 -3 चेंडू, 3 षटकार, शमी 53-3)

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com