तालिबानच्या हल्ल्यानंतर अफगाणिस्तानचा राशिद खान IPL खेळणार?

Rashid Khan
Rashid Khan

तालिबानने अफगाणिस्तानच्या बहुतांश भागावर केला कब्जा

IPL 2021: अफगाणिस्तानवर तालिबानने हल्ला चढवला आणि त्यांच्या बहुतांश भागावर कब्जा केला. आता तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सत्तास्थापनेच्या हालचालीही सुरु केल्या. अमेरिकेने सैन्य माघारी घेतल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानमधील सर्व प्रांत ताब्यात घेतले. काबुलसह सर्व मोठी शहरे तालिबानने ताब्यात घेतली. या साऱ्याचा परिणाम अफगाणिस्तानच्या नागरिकांवर झाला. अफगाणिस्तानचे नागरिक आता देशाबाहेर पळून जाण्याच्या प्रयत्नात आहेत. अशा परिस्थितीत अफगाणिस्तानचा राशिद खान नक्की कुठे आहे आणि त्याची अपडेट काय? याबाबत इंग्लंडचा माजी फलंदाज केविन पीटरसन याने माहिती दिली.

Rashid Khan
IPL 2021 : ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मोठा दिलासा!

अफगाणिस्तानचे सैन्य आणि पोलिस तालिबानच्या हल्ल्यासमोर निष्प्रभ ठरले. अफगाणिस्तानमध्ये तालिबानने धुडगूस घातला. अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खान 'द हंड्रेड' नावाची स्पर्धा खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये असला तरी त्याचे कुटुंबीय अफगाणिस्तानमध्ये आहेत. त्यांच्याबाबत पीटरसनने माहिती दिली. राशिद खानने पीटरसनशी संवाद साधला. त्याबाबत पीटरसन म्हणाला, "राशिद माझ्याशी बोलला. त्याच्या देशात खूप काही घडतंय असं त्याने मला सांगितलं. राशिद खूप चिंतेत आहे. त्याला त्याच्या कुटुंबाला अफगाणिस्तानमधून बाहेर काढणं शक्य झालेलं नाही, असं त्याने मला सांगितलं. अशा परिस्थितीत सारं काही बाजूला ठेवून सामना खेळणं आणि कामगिरी करणं हा मुद्दा खूपच कठीण आहे."

Rashid Khan
IPL 2021: अडथळ्यांची शर्यत पार करून CSKचा संघ अखेर युएईला रवाना

पीटरसनच्या या मुलाखतीनंतर अफगाणिस्तानचे राशिद खान आणि मोहम्मद नबी हे दोघे IPL 2021 खेळणार का? असा प्रश्न सोशल मीडियावर विचारण्यात येत होता. त्याबद्दल हैदराबाद संघाकडून उत्तर देण्यात आले. "सध्या अफगाणिस्तानमध्ये जी परिस्थिती आहे त्याबद्दल आमचं नबी किंवा राशिदशी बोलणं झालेलं नाही. पण ते स्पर्धेसाठी उपलब्ध असतील असं त्यांनी सांगितलं आहे. आमचा संघ ३१ ऑगस्टला युएईला रवाना होणार आहे", अशी माहिती सनरायझर्स हैदराबाद संघाचे सीईओ के षण्मुगम यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com