
अद्याप एकदाही आयपीएल न जिंकलेल्या आरसीबीची विजेतेपदासाठी प्रत्येक हंगामात धडपड सुरु आहे.
नवी दिल्ली - रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने गेल्या हंगामात चांगली कामगिरी केल्यानंतरही 9 खेळाडूंना रिलीज केलं आहे. दरम्यान, संघातील पार्थिव पटेलने आधीच निवृत्तीची घोषणा केली. यानंतर आता लिलावात आरसीबीने नव्या खेळाडूंसाठी बोली लावण्यास सुरुवात केली.
आरसीबीला पाहिजे असलेला स्टीव्ह स्मिथ खेळाडून दिल्लीने घेतला आहे. आरसीबीने 1.2 कोटी रुपयांची बोली लावत सुरुवात केली होती. अखेर दिल्लीने 2.2 कोटी रुपये मोजून स्मिथला संघात घेतलं.
अद्याप एकदाही आयपीएल न जिंकलेल्या आरसीबीची विजेतेपदासाठी प्रत्येक हंगामात धडपड सुरु आहे. संघाच्या फलंदाजीची धुरा फक्त विराट आणि डिव्हिलियर्स या दोघांवरच होती. त्यांच्यावरचा दबाव कमी व्हावा यासाठी फलंदाज घेण्याकडे टीमचा कल आहे.
IPL 2021 Player Auction 2021 अपडेट - एका क्लिकवर
आरसीबीने रिटेन केलेले खेळाडू - विराट कोहली, एबी डिविलियर्स, युजवेंद्र चहल, देवीदत्त पड्डीकल, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, केन रिचर्ड्सन, एडम झाम्पा, जोश फिलिप, शाहबाज अहमद आणि पवन देशपांडे.
RCB had an opening bid, but Delhi Capitals have entered the bidding and he is SOLD to @DelhiCapitals for 2.2Cr INR #IPLAuction
— IndianPremierLeague (@IPL) February 18, 2021
रिलीज केलेले खेळाडू - गुरकीरत सिंह मान, मोईन अली, पार्थिव पटेल (सर्व प्रकारातून निवृत्ती), पवन नेगी, शिवम दुबे, उमेश यादव, अॅरॉन फिंच, क्रिस मॉरिस, डेल स्टेन, इसुरू उदाना.
ट्रेड्स - दिल्ली कॅपिटल्सचा डॅनियल सॅम्स आणि हर्षल पटेल