esakal | IPL 2021 : पुन्हा कोरोनाची धास्ती; टीम इंडियातील 6 स्टार खेळाडूंवर BCCI ची नजर
sakal

बोलून बातमी शोधा

IPL 2021

IPL 2021 : पुन्हा कोरोनाची धास्ती; टीम इंडियातील 6 स्टार खेळाडूंवर BCCI ची नजर

sakal_logo
By
सुशांत जाधव

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडिच्या ताफ्यात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर भारत-इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील मँचेस्टर मैदानातील नियोजित सामना आयत्यावेळी रद्द करण्यात आला. सामना रद्द झाल्यानंतर अनेक चर्चा रंगत असताना आता युएईतील दुसऱ्या टप्प्यातील आयपीएल स्पर्धा सुरळीत पार पडणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

इंग्लंड दौऱ्यावरील चौथ्या कसोटी सामन्यादरम्यानच भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यापाठोपाठ गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांचे कोरोना रिपोर्टही पॉझिटिव्ह आले होते. यांच्या सपर्कातील मुख्य फिजिओ नितीन पटेल क्वारंटाईन असताना संघासोबत असलेल्या सहाय्यक फिजिओ योगेश परमार यांना कोरोनाची लागण झाली. बुधवारी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंची कोरोना टेस्ट झाली. सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह असतानाही सामना रद्द करण्यात आला. या निर्णयावरुन अनेक चर्चा रंगत असताना आयपीएलवर कोरोनाचे संकट घोंगावत असल्याची चर्चाही क्रिकेट वर्तुळात रंगताना दिसत आहे.

हेही वाचा: IND vs ENG : इंग्लंडचा आडमुठेपणा; विराटचा प्रस्ताव नाकारला

टीम इंडियासह इंग्लंडच्या संघातील खेळाडू युएईमध्ये रंगणाऱ्या आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धेसाठी आपापल्या फ्रेंचायझी टीमला जॉईन होतील. मुंबई इंडियन्सचा कर्णधारासह जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव युएईला दाखलही झाले आहेत. या सर्वांना क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण करावा लागणार आहे.

इंग्लंड दौऱ्यात कोरोनाची लागण झालेल्या सहाय्यक फिजिओ योगेश परमार यांच्या संपर्कात काही खेळाडू आले आहेत. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, चेतेश्वर पुजारा, रविंद्र जाडेजा आणि मोहम्मद सिराज हे दिग्गज खेळाडू योगेश परमार यांच्या संपर्कात होते. त्यामुळे BCCI या खेळाडूंवर खास नजर ठेवून आहे.

हेही वाचा: IPL 2021 : मुंबई इंडियन्स फॅमिलीची खास झलक; फोटो एकदा पाहाच

इनसाइडस्पोर्टच्या वृत्तानुसार, मोहम्मद सिराज रवी शास्त्री आणि विराट कोहली ज्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते त्या कार्यक्रमाला उपस्थितीत होता. मॅच पुढे ढकलावी असे मत व्यक्त करणाऱ्यांमध्ये रोहित शर्माच्या नावाचा समावेश आहे. चौथ्या सामन्यानंतर रोहित शर्मा स्नायु दुखापतीने त्रस्त होता. यावेळी तो फिजिओ परमार यांच्या संपर्कात आला होता. या खेळाडूंना बीसीसीआयने खास सूचना दिल्या असून हॉटेल रुममधून बाहेर न पडण्याच्या सूचना केल्या आहेत.

loading image
go to top