esakal | IND vs ENG : इंग्लंडचा आडमुठेपणा; विराटचा प्रस्ताव नाकारला
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli

IND vs ENG : इंग्लंडचा आडमुठेपणा; विराटचा प्रस्ताव नाकारला

sakal_logo
By
सुशांत जाधव

ECB Denied Virat Kohli’s Suggestion of Delayed Start of 5th Test Match: भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील मँचेस्टरच्या मैदानात रंगणारा पाचवा कसोटी सामना अखेर रद्द करण्यात आला. ECB आणि BCC च्या चर्चेनंतर सामना रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर या सामन्यामागील काही घटना हळूहळू समोर येत आहेत.

ब्रिटीश प्रसारमाध्यमांनी टीम इंडियाला बदनाम करण्याचा प्रकारही केला. टीम इंडियाने खेळायला असमर्थता दर्शवल्यामुळे कसोटी रद्द करण्याची वेळ आली, असं गाण ब्रिटन प्रसारमाध्यमांनी वाजवलं. टीम इंडिया आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा आयपीएलल अधिक महत्त्व देत असल्याच्या चर्चाही रंगत आहेत. यात आता आणखी एक बाजू समोर येत आहे.

इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या आडमुठेपणामुळे हा सामना रद्द झाल्याची चर्चा आता जोर धरत आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डासमोर एक प्रस्ताव ठेवला होता. खेळाडूंच्या आरोग्याची खबरदारी म्हणून सामना दोन ते तीन दिवसांनी पुढे ढकलण्यात यावा, अशी विनंती विराट कोहलीने केली होती. पण इंग्लंड बोर्डाने त्याचा हा प्रस्ताव धुडकावून लावला.

हेही वाचा: IND vs ENG मालिकेमध्ये भारताने काय कमावलं? जाडेजा म्हणतो...

डीएनएच्या वृत्तानुसार, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) हा प्रस्ताव बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांसमोरही ठेवला होता. बीसीसीआयने ईसीबीसोबतच्या चर्चेत हा प्रस्ताव मांडला देखील. पण निर्धारित वेळापत्रकात बदल करण्यात त्यांनी साफ नकार दिला.

हेही वाचा: "इंग्लंड क्रिकेट बोर्डाने तेव्हा काय केलं होतं विसरू नका"

विराट कोहलीने भारतीय क्रिकेटर्सच्या वतीने बाजू मांडताना म्हटले होते की, स्टाफ सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. खेळाडूंच्या यातील काही लक्षण आहेत का हे पाहण्यासाठी एक-दोन दिवसांचा अवधी घ्यावा लागेल. 24 ते 48 तासानंतर खेळाडूंची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली तर सामना खेळण्यास काहीच हरकत नाही. आपण पाचव्या कसोटी सामन्याची तयारी दोन-तीन दिवसांनी करु शकतो. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह संघातील मुख्य खेळाडू क्वारंटाईनमध्ये आहेत. टीमच्या रणनितीसाठी त्यांचे संघासोबत असणे महत्त्वाचे आहे, असेही कोहलीने म्हटले होते.

loading image
go to top