esakal | IPL च्या इतिहासातील धोनीच्या चौकाराची 'अनटोल्ड स्टोरी'
sakal

बोलून बातमी शोधा

MS Dhoni

IPL च्या इतिहासातील धोनीच्या चौकाराची 'अनटोल्ड स्टोरी'

sakal_logo
By
टीम सकाळ

IPL 2021, KKR vs CSK : मुंबईच्या वानखेडेच्या मैदानात चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना 200+ धावा केल्या. सलामीवीर फाफ ड्युप्लेसीस शेवटपर्यंत नाबाद राहिला. तर ऋतूराज गायकवाडनेही अर्धशतकी खेळी केली. ओपनिंग पेयर्सच्या शतकी भागीदारीच्या जोरावर चेन्नईच्या संघाने 200 धावांचा टप्पा सहज पार केला. सलामीवीरांनी दमदार सुरुवात करुन दिल्यानंतर मोईन अली नेहमीप्रमाणे वन डाउनला आला. तर धोनी चौथ्या क्रमांकावर खेळायला आल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात धोनीने आजपर्यंत जे जमलं नाही ते करुन दाखवलं. आयपीएलच्या इतिहासात त्याने सुनील नरेनला पहिली बाउंड्री मारली.

क्रीडा क्षेत्रातील बातम्यांसाठी येथ क्लिक करा

मोईन अली आउट झाल्यानंतर कॅप्टन कूल धोनीची एन्ट्री झाली. 17 व्या ओव्हरमधील पाचव्या चेंडूवर धोनीने सुनील नरेनला खणखणीच चौकार मारला. आयपीएलच्या इतिहासात नरेनला लगावलेला धोनीचा हा पहिला चौकार ठरला. यासाठी धोनीला 67 इनिंग आणि 65 चेंडूची प्रतिक्षा करावी लागली. कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार इयॉन मॉर्नग याने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. चेन्नईच्या सलामीवीरांनी त्याचा निर्णय फोल ठरवला. चेन्नई सुपर किंग्जने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 3 विकेटच्या मोबदल्यात 220 रन्स केल्या होत्या. फाफ ड्युप्लेसीसने 60 बॉलमध्ये 9 फोर आणि 4 सिक्सरसह 95 रन्स केल्या.

हेही वाचा: IPL 2021 : 4 कोटींचा हिरो ठरतोय झिरो

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या मॅचमध्ये महेंद्र सिंह धोनीने 8 बॉलमध्ये 17 रन्स केल्या. या धावा संघासाठी महत्वपूर्ण ठरल्या. याशिवाय त्याच्या नावे आणखी एका खास विक्रमाचीही नोंद झालीय. केकेआर विरुद्धच्या सामन्यात धोनीने विकेटमागे तीन कॅच पकडले. या कॅचसह आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात विकेटमागे उभा राहुन सर्वाधिक गड्यांन तंबूत धाडण्याचा विक्रमही माहीच्या नावे झालाय. त्याने 151 जणांना बाद केले आहे. 2008 मॅचेसमधील 201 डावात धोनीने विकेटमागे 112 कॅच तर 39 स्टंपिंग केले आहे.

loading image