esakal | IPL 2021 : 4 कोटींचा हिरो ठरतोय झिरो

बोलून बातमी शोधा

Nicholas Pooran

IPL 2021 : 4 कोटींचा हिरो ठरतोय झिरो

sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

IPL 2021, PBKS vs SRH, 14th Match : चेन्नईच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात पंजाब किंग्जच्या (Punjab Kings) पदरी निराशा पडली. सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) पराभवाच्या हॅटट्रिकमधून सावरत पहिला सामना जिंकला. दुसरीकडे पंजाबच्या नावे पराभवाची हॅटट्रिक नोंदवली गेली. पंजाबचा महागडा गडी या सामन्यात पुन्हा फेल ठरल्याचे पाहायला मिळाले. निकोलस पूरनला डेविड वॉर्नरने रन आउट केले. एकही चेंडू न खेळता त्याला शून्यावर माघारी फिरण्याची वेळ आली. चौथ्या डावात चौथ्यांदा तो शून्यावर बाद झालाय.

हेही वाचा: IPL 2021: SRH वाल्यांनी नेटकऱ्यांच ऐकलं; पांड्येजीच्या जागी केदार भाऊला संधी

पंजाब किंग्जच्या (Punjab Kings) ताफ्यातील प्रमुख फलंदाज असलेल्या कॅरेबियन निकोलस पूरनच्या नावे लाजीरवाण्या विक्रमाची नोंद झालीये. क्रिकेट चाहते सोशल मीडियावर त्याला ट्रोलही करताना पाहायला मिळाले. पंजाबने कॅरेबियन खेळाडूसाठी तब्बल 4.2 कोटी मोजले आहेत. निकोलस पूरनची यंदाच्या हंगामातील आतापर्यंतची कामगिरीही खूपच निराशजनक राहिली आहे. राजस्थान विरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये तो केवळ एक बॉल खेळला. क्रिस मॉरिसने त्याला शून्यावर बाद केले. चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्धच्या सामन्यात त्याने पहिल्या सामन्याच्या तुलनेत एक चेंडू ज्यादा खेळला. पण याही सामन्यात त्याला खाते उघडता आले नाही. दीपक चाहरने त्याची विकेट घेतली होती. खाते उघडले पण दोन धावांवर दीपक चाहरने त्याला चालते केले. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या मॅचमध्ये त्याने स्पर्धेतील पहिली रन घेतली. या मॅचमध्ये त्याने 8 बॉलमध्ये 9 रन्स केल्या. आवेश खानने त्याची विकेट घेतली होती.

हेही वाचा: IPL 2021: सेनापती जिंकला, पण संघ हरला! राहुलने कोहली-रोहितला टाकले मागे

सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या मॅचमध्ये चोरटी धाव घेणं त्याला महागात पडले. एकही चेंडू न खेळणाऱ्या पूरन डेविड वॉर्नरने मारलेल्या अचूक थ्रोवर त्याला तंबूत परतावे लागले. चार सामन्यात मिळून त्याने अवघ्या 9 धावा केल्या आहेत. तीन सामन्यात तो शून्यावर बाद झालाय. निकोलस पूरनने आयपीएलमध्ये आतापर्यंत 154 डावात 24 च्या सरासरीने 3154 धावा केल्या आहेत. यात एका शतकासह 16 अर्धशतकाचा समावेश आहे. त्याचे आयपीएलमधील स्ट्राईक रेट हे 144 आहे.