esakal | IPL 2021, CSK vs RR Live Updates : चेन्नईला पहिला धक्का
sakal

बोलून बातमी शोधा

मोईन अली,जडेजाने मॅच फिरवली; चेन्नईचा मोठा विजय

मोईन अली,जडेजाने मॅच फिरवली; चेन्नईचा मोठा विजय

sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

मुंबई : रविंद्र जडेजा आणि मोईन अली यांच्या फिरकीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सचे कंबरडे मोडले. जडेजाने सेट झालेल्या बटलरला बोल्ड करत सामन्यात जान आणली. त्यानंतर त्याने शिवम दुबेला पायचित केले. त्यानंतर मोईन अलीने आपल्या फिरकीची जादू दाखवली. या दोघांनी राजस्थानच्या बाजूने झुकलेला सामना चेन्नई सुपर किंग्जच्या बाजूने वळवला. चेन्नई सुपर किंग्जने दिलेल्या 189 धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सचा संघाला 9 बाद 143 धावांपर्यंत मजल मारता आली. चेन्नईच्या संघाने 45 धावांनी सामना जिंकला. मोईन अलीने सर्वाधिक 3 तर जडेजा आणि सॅम कुरेन यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट घेतल्या.

 • 95-7 : क्रिस मॉरिसला मोईन अलीने खातेही उघडू दिले नाही

 • 95-6 : रियान पराग 3 धावा करुन मोईनच्या जाळ्यात अडकला

 • 92-5 : मोईन अलीने डेविड मिलरला अवघ्या 2 धावांवर धाडले माघारी

 • 90-4 : जडेजाने शिवम दुबेलाही केलं चालता, त्याने 20 चेंडूत 17 धावांची भर घातली

 • 87-3 : तुफान फटकेबाजी करणारा जोस बटलरला जड्डूनं केल बाद, तो 35 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 49 धावा केल्या

 • 45-2 : सॅम कुरेनला आणखी एक यश, संजू सॅमसन अवघी एका धावेची भर घालून परतला

 • 30-1 : नमन वोहरा 11 चेंडूत 14 धावा करुन माघारी, सॅम कुरेनन घेतली विकेट

 • निर्धारित 20 षटकात चेन्नईने 9 गड्यांच्या मोबदल्यात 188 धावा केल्या, ड्वेन ब्रावोने अखेरच्या टप्प्यात तुफान फटकेबाजी केली. त्याने 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 8 चेंडूत नाबाद 20 धावा केल्या

 • 180-9 : शार्दुल ठाकूरच्या रुपात चेन्नईच्या संघातील दुसरा गडी रन आउट त्याने अवघी 1 धाव केली

 • 174-8 : सॅम कुरेन 6 चेंडूत 13 धावा करुन झाला रनआउट

 • 163-7 : क्रिस मॉरिसने घेतली रविंद्र जडेजाची विकेट, अवघ्या 8 धावांवर परतावे लागले तंबूत

 • 147-6 : साकारियाने MS धोनीला धाडले माघारी, त्याने 17 चेंडूत 2 चौकाराच्या मदतीने 18 धावा केल्या

 • 125-5 : साकारियाने रैनालाही धाडले माघारी, त्याने 15 चेंडूत केल्या 18 धावा

 • 123-4 : 17 चेंडूत 27 धावा करुन अंबाती रायडू बाद, साकारियाला मिळाले यश

 • 78-3 : राहुल तेवतियाने चेन्नई सुपर किंग्जला दिला तिसरा धक्का, मोईन अली 20 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 26 धावा करुन परागच्या हाती कॅच देऊन परतला

 • 45-2 : क्रिस मॉरिसनं सलामीवीर फाफ ड्युप्लेसीसला रियान परागकरवी केलं झेल बाद, त्याने 17 चेंडूत 33 धावा केल्या. यात फाफने 4 चौकार आणि दोन षटकार खेचले

25-1 : मुस्ताफिझूरनं घेतली ऋतूराज गायवाडची विकेट, तो 13 चेंडूत 10 धावा करुन परतला

 • ऋतूराज गायकवाड आणि फाफ ड्युप्लेसीसनं केली चेन्नईच्या डावाची सुरुवात

Chennai Super Kings XI: फाफ ड्युप्लेसीस, ऋतूराज गायकवाड, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायडू, एमएस धोनी, रविंद्र जडेजा, सॅम कुरेन, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर.

Rajasthan Royals XI: मनन ओहरा, जोस बटलर, संजू सॅमसन, शुभम दुबे, डेविड मिलर, रियान पराग, राहुल तेवतिया, क्रिस मॉरिस, जयदेव उनादकट, चेतन सकारिया, मुजीम रहमान.

 • राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन याने टॉस जिंकून घेतला फिल्डिंगचा निर्णय