esakal | DC vs RCB : थुंकी लावताना सापडला; अंपायरने दिली वॉर्निंग (VIDEO)
sakal

बोलून बातमी शोधा

DC vs RCB : थुंकी लावताना सापडला; अंपायरने दिली वॉर्निंग (VIDEO)

DC vs RCB : थुंकी लावताना सापडला; अंपायरने दिली वॉर्निंग (VIDEO)

sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना रंगला आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन ऋषभ पंतने टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय दिला. पावर प्ले संपल्यानंतर पंतने स्टार फिरकीपटू अमित मिश्राच्या हाती चेंडू सोपवला. पहिला चेंडू टाकण्याअगोदरच मिश्राने मोठी चूक केली. त्याने बॉलला थुका लावला. कोरोनाच्या काळात सुरु असलेल्या स्पर्धेत बॉलवर थुका लावण्यावर बंदी घालण्यात आली आहे. अनेकदा सवयीमुळे फिल्डर किंवा गोलंदाजाकडून ही चूक घडते. मिश्राकडून देखील अशाच प्रकारे अनावधानाने कोरोना नियमावलीचे उल्लंघन झाले. मैदानातील अंपायर विरेंद्र शर्मा यांनी त्याला पहिली वॉर्निगही दिलीये.

मागील वर्षी कोरोना संकटानंतर इंग्लंडच्या मैदानातून क्रिकेट अनलॉक झाले. क्रिकेटला सुरुवात झाल्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने काही कठोर नियमाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. यात चेंडूला थुंकी लावण्यावर निर्बंध घालण्यात आले. पहिल्यांदा अशी चूक झाली तर खेळाडूला वॉर्निंग देण्यात येत. पुन्हा जर असा प्रकार घडला तर संघाला 5 धावांचा भूर्दंड सोसावा लागू शकतो. तसेच वारंवारची चूक खेळाडूला संघाबाहेरही ठेवू शकते.

loading image
go to top