esakal | "फायनल जिंकायची असेल तर..."; स्टीव्ह स्मिथने सांगितला प्लॅन
sakal

बोलून बातमी शोधा

Steve-Smith-DC

"फायनल जिंकायची असेल तर..."; स्टीव्ह स्मिथने सांगितला प्लॅन

sakal_logo
By
विराज भागवत

IPL 2021 च्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवात १९ सप्टेंबरपासून

IPL 2021: भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये आहे. कसोटी मालिका संपल्यानंतर भारतीय संघ आणि इतर खेळाडू IPL साठी युएईमध्ये दाखल होणार आहेत. भारतात IPL 2021ची सुरूवात झाली होती. पण कोरोनाच्या संसर्गामुळे तो हंगाम मध्यातच थांबवावा लागला. आता १९ सप्टेंबर पासून या हंगामातील दुसरा टप्पा सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी दिल्ली संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर उपलब्ध नसल्यामुळे ऋषभ पंत याला नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली होती. आता श्रेयस अय्यर संघात दाखल झाला असला तरीही संघाची धुरा ऋषभ पंतकडेच आहे. याच संघात असलेल्या स्टीव्ह स्मिथने एक महत्त्वाचे विधान केले आहे.

हेही वाचा: IPL 2021 मधून बड्या खेळाडूंची माघार... संघांना फटका बसणार?

"दुसऱ्या टप्प्यात खेळताना सर्वात मोठं आव्हान म्हणजे जिथे स्पर्धा थांबवण्यात आली होती, तेथून पुढे आम्हाला सुरूवात करावी लागणार आहे. पहिल्या टप्प्यात आम्ही संघ म्हणून खूप चांगली कामगिरी करून दाखवली. सामन्यांचे निकालदेखील आम्हाला अपेक्षित असेच राहिले. त्यामुळे मला वाटतं की दुसऱ्या टप्प्यात आमची कामगिरी अधिक चांगली होईल. तुम्हाला जर एखाद्या स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारायची असेल तर खूप चांगलं खेळावं लागतं. पण जर स्पर्धा जिंकायची असेल, तर मात्र फायनलमध्ये सर्वोत्तम खेळ करावा लागतो. ते आम्हाला करावं लागेल", असं स्टीव्ह स्मिथ म्हणाला.

हेही वाचा: IPL 2021: पंजाबच्या संघाने ताफ्यात आणला इंग्लंडचा स्टार खेळाडू

"आम्ही एकत्र खेळून बराच कालावधी लोटला आहे. त्यामुळे आम्हाला संघ म्हणून एकमेकांशी जुळवून घेण्यास थोडा वेळ लागेल. पण ते पटकन होऊ शकेल. आमच्या संघाच खूप चांगले खेळाडू आहेत. श्रेयस अय्यरदेखील संघात परतला आहे. त्यामुळे आमची फलंदाजी अधिक बळकट झाली आहे. तो प्रतिभावंत खेळाडू आहे. त्यामुळे तो संघात असण्याचा नक्कीच फायदा होईल", असा विश्वास स्टीव्ह स्मिथने व्यक्त केला.

विशेष म्हणजे, IPL 2021च्या गुणतक्त्यात दिल्लीचा संघ सध्या पहिल्या स्थानी आहे.

loading image
go to top