esakal | IPL 2021: विराट म्हणाला, स्ट्राईक देतो आधी सेंच्युरी कर!

बोलून बातमी शोधा

Virat and Devdutt
IPL 2021: विराट म्हणाला, स्ट्राईक देतो आधी सेंच्युरी कर! Video
sakal_logo
By
टीम ई सकाळ

IPL 2021: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने यंदाच्या हंगामात सलग चौथ्या विजयाची नोंद केली. कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि देवदत्त पडिक्कल या सलामीच्या जोडीने राजस्थान रॉयल्सच्या संघाने दिलेले टार्गेट 17 व्या षटकात पार केले. देवदत्त पडिक्कलने या सामन्यात पहिले वहिले आयपीएल शतक झळकावले. त्याने 51 चेंडूत नाबाद 101 धावांची खेळी केली. त्याच्या शतकाला कोहलीने हातभार लावल्याचे दिसले.

आयपीएल आणि क्रीडा क्षेत्रातील इतर बातम्यांसाठी येथे क्लिक करा

मॅचनंतर कोहली म्हणाला की, देवदत्तची इनिंग प्रभावित करणारी होती. यापूर्वीच्या हंगामातील पिहिल्या सत्रातही त्याने उत्तम खेळ दाखवला होता. 40-50 धावा केल्यानंतर आक्रमक फलंदाजी करण्यासंदर्भात पडिक्कलसोबत चर्चा झाली होती, असेही विराटने सांगितले. या सामन्यात विराट कोहलीनेही 72 धावा केल्या. पण तो एका बाजूने संयमी खेळ करताना दिसला. आपल्या या पवित्र्याने त्याने पडिक्कलला शतकाची एक संधीच दिल्याचे वाटते. पडिक्कल हा प्रतिभावंत खेळाडू असून त्याचे भविष्य उज्वल असल्याचेही विराट यावेळी म्हणाला.

हेही वाचा: IPL 2021 : पडिक्कलची 'रॉयल' खेळी; IPL मधील पहिली सेंच्युरी

आपली संयमी खेळी आणि पडिक्कलचे आक्रम तेवर यावर विराट म्हणाला की, तुम्ही प्रत्येकवेळी आक्रमक खेळ दाखवला पाहिजे असे नाही. जर तुमच्या सोबत खेळणारा आक्रमक खेळत असेल तर तुम्हाला गियर बदलावा लागतो. जर मी आक्रमक खेळलो असतो तर समोरच्याला संयमी खेळ करावा लागला असता. त्यामुळे स्ट्राईक रोटेट करण्यावर अधिक भर दिला. या सामन्यात मैदानात तग धरुन खेळण्याचा निश्चय केला होता. पिच चांगले होते. शेवटच्या टप्प्यात आक्रमक भूमिका घेतली, असे विराट म्हणाला.

हेही वाचा: IPL 2021, RCB vs RR : बंगळुरुचा विजयी चौकार

शतकाच्या जवळ असताना पडिक्कलला कर्णधार विराटने मॅचन फिनिश करावी असे वाटत होते. यावेळी तुला स्ट्राईक देतो आयपीएलमधील पहिले शतक साजरे कर, असे विराटने त्याला सांगितले. ठिक आहे म्हणत अशा अनेक इनिंग खेळायच्या म्हणत कर्णधाराच्या साथीने पहिल्या वहिल्या शतकाला गवसणी घातली. पडिक्कल शिवाय गोलंदाजीतील आक्रमकता आणि टीममधील सहाकाऱ्यांमध्ये असणारी सकारात्मकता विजयात महत्त्वाची ठरली, असेही कोहलीने म्हटले.