esakal | पडिक्कलची 'रॉयल' खेळी; IPL मधील पहिली सेंच्युरी

बोलून बातमी शोधा

Devdutt Padikkal
IPL 2021 : पडिक्कलची 'रॉयल' खेळी; IPL मधील पहिली सेंच्युरी
sakal_logo
By
सुशांत जाधव

मुंबईतील वानखेडेच्या मैदानात राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्सचा युवा सलामीवर देवदत्त पदिक्कलला अखेर सुर गवसला. पहिल्या तीन सामन्यात संघर्ष करणाऱ्या पदिक्कलने आयपीएलमधील आपले पहिले शतक झळकावले. यंदाच्या हंगामातील हे दुसरे शतक आहे. या हंगामातील पहिले शतक संजू सॅमसनने झळकावले होते. त्याने केलेली 119 धावांची खेळी आतापर्यंतची सर्वोच्च खेळी आहे.

देवदत्त पडिक्कलने या शतकासह एक खास विक्रम आपल्या नावे केलाय. आयपीएलमध्ये शतकी खेळी करणारा तो तिसरा भारतीय अनकॅप्ड प्लेअर आहे. 2019 च्या हंगामात मनिष पांड्येने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळताना डेक्क चार्जस विरुद्ध नाबाद 114 धावांची खेळी केली होती. 2011 मध्ये पॉल वल्थाटी याने किंग्ज इलेव्हन पंजाब (सध्याचा पंजाब किंग्ज) संघाकडून खेळताना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध 120 धावांची नाबाद खेळी केली होती. त्यानंतर आता देवदत पदिक्कलने शतकी कामगिरी केली आहे.

हेही वाचा: IPL च्या इतिहासातील धोनीच्या चौकाराची 'अनटोल्ड स्टोरी'

स्पर्धेपूर्वी देवदत्त पडिक्कलचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे मुंबई इंडियन्स विरुद्धच्या पहिल्या सामन्यात तो खेळताना दिसले नव्हते. त्यानंतरच्या दोन सामन्यात त्याच्याकडून नावाला साजेसा खेळ झाला नाही. सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात त्याने 13 चेंडूत 11 धावांची खेळी केली. भुवीने त्याला नदीमकरवी झेलबाद केले होते. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात त्याने यात आणखी भर घातली. पण 25 धावांवर तो प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर बाद झाला. या दोन सामन्यातील उणीव भरुन काढत त्याने शतकी धमाका केला.