esakal | IPL 2021: तुमचं तुम्ही बघा; खेळाडूंना UAE ला पोहचवण्याचा प्लॅन बदलला
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit Sharma

IPL 2021: तुमचं तुम्ही बघा; खेळाडूंना UAE ला पोहचवण्याचा प्लॅन बदलला

sakal_logo
By
सुशांत जाधव

IPL 2021: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना रद्द करण्यात आला आहे. भारतीय संघातील ताफ्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने स्पर्धा निकालाशिवाय रोखली असताना आता भारतीय खेळाडू आयपीएल स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी मँचेस्टरहून UAE ला रवाना होणार आहेत. मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indian) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) सह मुंबई इंडियन्सच्या चंबुतील भारतीय संघासोबत असणारे सर्व खेळाडू शनिवारीच UAE ला रवाना होणार आहेत. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यांच्या मालिकेनंतर बीसीसीआय सर्व खेळाडूंना इंग्लंडहून युएईला पोहचवणार होते. पण आता यात बदल झाला असून फ्रेंचायझींनाच आपल्या खेळाडूंची व्यवस्था करावी लागणार आहे.

चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि पंजाब किंग्ज (Punjan Kings) संघातील खेळाडूंना इंग्लंडहून युएईला नेण्यासाठी त्यांच्या त्यांच्या फ्रेंचायझींकडून प्रयत्न सुरु झाले असून आपापल्या खेळाडूंसाठी कमर्शियल चार्टड विमानाची व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.

इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यानंतर सर्व खेळाडूंना चार्टर्ड विमानाने इंग्लंडहून युएईला पाठवण्याचा प्लॅन बीसीसीआयने आखला होता. पण पाचवा कसोटी सामना रद्द झाल्यानंतर परिस्थिती बदलली आहे. रोहित शर्माशिवाय मुंबई इंडियन्सकडून खेळणारे जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव आपापल्या कुटुंबियांसोबत असून ते मँचेस्टरहून शनिवारी दुबईला रवाना होणार असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा: जे फेडरर-नदालला जमलं नाही ते जोकोविच करुन दाखवणार?

रविंद्र जडेजा, चेतेश्वर पुजारा, शार्दुल ठाकूर, मोईन अली आणि सॅम कुरेन हे इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळणारे खेळाडूही सध्या इंग्लंडमध्येच आहेत. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने 19 सप्टेंबरपासून दुसऱ्या टप्प्यातील आयपीएल स्पर्धेसाठी सरावाला सुरुवात केली आहे. पंजाब किंग्जच्या ताफ्यातील (Punjab Kings) केएल राहुल (KL Rahul), मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) मोहम्मद शमी आणि डेविड मलान मॅनचेस्टरमध्येच आहेत. एएनआयच्या वृत्तानुसार, रॉयल चँलेंजर्स बंगळुरु (RCB) रविवारी चार्टर्ड विमानाने कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि मोहम्‍मद सिराज यांना मँचेस्‍टरहून दुबईला येण्याची व्यवस्था करणार आहेत.

हेही वाचा: आता एम्मा राडूकानू विरुद्ध लैला फर्नांडिज

कसोटी सामना रद्द झाल्यामुळे बीसीसीआय खेळाडूंना चार्टर्ड विमानाने इंग्लंडहून युईएला पाठवण्याची व्यवस्था करणार नाही. त्यामुळे आता फ्रेंचायझींनाच आपापल्या खेळाडूंची व्यवस्था करावी लागणार आहे, असे आयपीएलशी संबंधित एका अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

loading image
go to top