esakal | ...म्हणून भज्जीनं मानले शाहरुखचे आभार!
sakal

बोलून बातमी शोधा

KKR

...म्हणून भज्जीनं मानले शाहरुखचे आभार!

sakal_logo
By
टीम ई सकाळ

आयपीएलच्या 14 व्या हंगामातील कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामना स्थगित करण्याची नामुष्की आयोजकांवर ओढावली. कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफ्यातील वरुण चक्रवर्ती आणि संदीप वारियर्स या दोघांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सामना स्थगित करण्याचा निर्णय झाला असला तरी चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही. या दोघांशिवाय अन्य खेळाडूंचे रिपोर्ट हे निगेटिव्ह आहेत, अशी माहिती बीसीसीआय आणि कोलकाता नाईट रायडर्सने दिली होती.

हेही वाचा: IPL 2021 : स्पर्धा संकटात; बायोबबलमध्ये कोरोना आला कसा?

कोलकाताच्या संघात असलेल्या हरभजन सिंगने ट्विटच्या माध्यातून सुखरुप असल्याची माहिती दिलीये. दोघांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असले तरी काळजी करण्यासारखे काही नाही. इतर सर्व सहकारी सुरक्षित असून ते नियमावलीचे पालन करत आहेत. सध्याच्या परिस्थितीत आवश्यक ते सहकार्या केल्याबद्दल शाहरुख खान आणि वेंकी मैसूर यांचे भज्जीने विशेष आभार मानले आहेत. केकेआर आमच्या कुटुंबियासारखाच आहे. शाहरुख आणि वेंकी मैसूर संघातील प्रत्येक खेळाडूसोबत आहेत, असा उल्लेख भज्जीने आपल्या ट्विटमध्ये केलाय.

हेही वाचा: IPL 2021: आजचा बंगळुरू-कोलकाता सामना रद्द!

मुंबई इंडियन्सने रिलीज केलेल्या हरभजन सिंगसाठी कोलकाता नाईट रायडर्सने 2 कोटी रुपये मोजले होते. आयपीएलच्या मिनी लिलावात हरभजन सिंगवर पहिल्या फेरीत कोणीच बोली लावली नव्हती. दुसऱ्या फेरीत कोलकाताने त्याला आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले. आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यात त्याला सातत्याने संधीही मिळाली. पण त्याला लक्षवेधी खेळी करता आली नव्हती. यंदाच्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना हरभजन सिंगने 7 ओव्हर टाकल्या. एकही विकेट न घेता यात त्याने 63 धावा खर्च केल्या. आतापर्यंतच्या आयपीएलसंदर्भात बोलायचे तर 163 सामन्यात त्याने 150 विकेट घेतल्या आहेत.

loading image