esakal | मोदी स्टेडियमवर पुणेरी पठ्याची 'उलटी पुट्टी' (VIDEO)
sakal

बोलून बातमी शोधा

rahul tripathi

IPL 2021 : मोदी स्टेडियमवर पुणेरी पठ्याची 'उलटी पुट्टी' (VIDEO)

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने लोकेश राहुलच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्जला खुलून खेळण्याची संधी दिली नाही. इयॉन मॉर्गनने टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा घेतलेला निर्णय KKR च्या बॉलर्स आणि फिल्डर्संनी सार्थ ठरवला. सर्वच गोलंदाजांनी जबरदस्त बॉलिंग केली आणि त्यांना फिल्डर्संनी उत्तम साथ दिली. या सामन्यात अष्टपैलू सुनील नरेनने दोन विकेट घेतल्या. यातील एक विकेट पुणेरी भाऊ राहुल त्रिपाठीचीच होती.

क्रीडा क्षेत्रातील बातम्यांसाठी येथे क्लिक करा

राहुल त्रिपाठीने डीप-मिडविकेटला मयांक अग्रवालचा एक सुंदर कॅच पकडला. सोशल मीडियावर या कॅचची जोरदार चर्चा सुरु आहे. अग्रवाल 12 व्या ओव्हरमध्ये आउट झाला. सुनील नरेनच्या शॉर्ट पिच बॉलवर मयांकने जोरदार फटका खेळला. बॉल आणि बॅटचा उत्तम ताळमेळ जुळला नाही आणि कॅचची संधी निर्माण झाली. राहुल त्रिपाठीने निर्माण झालेल्या संधीच सोनं करुन दाखलं. त्याने पळत येऊन जबरदस्त कॅच पकडला. त्याच्याकडून कॅच प्रयत्न अपयशी ठरलाय की काय असे तो प्रसंग पाहून वाटत होते. पण पलटी मारुन त्याने बॉल हातून निसटणार नाही, याची खबरदारी घेत संघाला मोलाची विकेट मिळवून दिली.

एका बाजूने पंजाबचा डाव कोसळत असताना सलामीवीर मयांकने डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. त्याने 34 बॉलमध्ये 31 रन्सची खेळी केली. यात त्याने 1 चौकार आणि 2 षटकारही मारल्याचे पाहायला मिळाले. केएल राहुल, ख्रिस गेल आणि दीपक हूड्डा आउट झाल्यानंतर मयांकने डाव सावरला मात्र उलटी पुल्टी फिल्डिंगचा नजराणा दाखवून देत राहुल त्रिपाठीनं त्याच्या खेळीला ब्रेक लावला.

हेही वाचा: IPL 2021 : ऑसी खेळाडूंसंदर्भात PM म्हणाले; तुमचं तुम्ही बघा!

फिल्डिंगमधील लक्षवेधी कामगिरीनंतर राहुल त्रिपाठीनं बॅटिंगवेळीही उपयुक्त खेळी केली. आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी फिरल्यानंतर राहुलने 32 बॉलमध्ये 7 चौकाराच्या मदतीने 41 धावांची खेळी केली. कॅप्टन इयॉन मॉर्गनने 40 बॉलमध्ये नाबाद 47 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. दिनेश कार्तिकने 6 बॉलमध्ये नाबाद 12 धावांची खेळी केली.

loading image