esakal | IPL 2021 : ऑसी खेळाडूंसंदर्भात PM म्हणाले; तुमचं तुम्ही बघा!
sakal

बोलून बातमी शोधा

IPL 2021

IPL 2021 : ऑसी खेळाडूंसंदर्भात PM म्हणाले; तुमचं तुम्ही बघा!

sakal_logo
By
टीम ई सकाळ

IPL 2021: ऑस्ट्रेलियन पंतप्रधान (Prime Minister of Australia) स्कॉट मॉरिसन (Scott Morrison) यांनी मंगळवारी आयपीएलमध्ये भाग घेतलेल्या खेळाडूंसंदर्भात मोठी भूमिका घेतलीये. आयपीएलमधून माघारी मायदेशी परतण्यासाठी खेळाडूंना स्वत:ची व्यवस्था स्वत: करावी लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. भारतात वेगाने वाढणाऱ्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर 15 मे पर्यंत भारतातून येणाऱ्या फ्लाईट्सला ऑस्ट्रेलियात नो एन्ट्री आहे.

क्रीडा क्षेत्रातील बातम्यांसाठी येथे क्लिक करा

भारतात कोरोनाची दुसरी लाट उसळल्यानंतर ऑस्ट्रेलियाने विमान वाहतूकीवर निर्बंध लादले आहेत. 15 मे पर्यंत भारतातून येणाऱ्या फ्लाईट्सला स्थगिती देण्यात आली आहे. यासंदर्भात मॉरिशन यांनीने ‘द गार्जियन'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये आयपीएलमध्ये व्यस्त असणाऱ्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंसंदर्भात मोठे भाष्य केले. ऑस्ट्रेलियन खेळाडू भारतात आपल्या वैयक्तिक कारणासाठी गेले आहेत. ते ज्या स्पर्धेत सहभागी झाले आहेत त्याचा ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाशी काही संबंध नाही. ते ज्याप्रमाणे स्वत:ची व्यवस्था करुन भारतात पोहचले आहेत. त्याचप्रमाणे ते पुन्हा मायदेशी परततील, असे ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी म्हटले आहे.

हेही वाचा: IPL 2021 : मॉर्गन-त्रिपाठीच्या जोरावर KKR ची बल्ले-बल्ले

अँड्र्यू टाय, केन रिचर्डसन आणि एडम झम्पा यांनी कोरोनाच्या धास्तीमुळे आयपीएल स्पर्धेतून माघार घेतली आहे. भारतात प्रत्येक दिवशी 3 लाखहून अधिक रुग्ण आढळत असली तरी आयपीएल स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसार होईल, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. सध्याच्या घडीला आस्ट्रेलियाचे 14 खेळाडू लीगमध्ये सहभागी आहेत. याशिवा. कोच रिकी पाँटिंग आणि सायमन कॅटिच, कमेंटेटर मॅथ्यू हेडन, ब्रेट ली, मायकल स्लेटर आणि लीजा स्टालेकर भारतातच आहेत.

मुंबई इंडियन्सच्या (MI) ताफ्यात असलेल्या क्रिस लिन (Chris Lynn) याने क्रिकेट आस्ट्रेलिया (Cricket Australia) ला विनंती केली आहे. आयपीएलनंतर खेळाडूंना मायदेशी परतण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करावी, अशी मागणी त्याने केली आहे. आयपीएलच्या लीग मॅचेस 23 मेला संपणार असून 30 मे रोजी स्पर्धेतील फायनल सामना अहमदाबादच्या मैदानावर नियोजित आहे. क्रिकेट आस्ट्रेलिया आणि आस्ट्रेलियन क्रिकेटर संघाने संयुक्त निवेदनात आयपीएलमध्ये सहभागी क्रिकेटर्स, कोच आणि कमेंटेटरच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट केले असून ऑस्ट्रेलियन सरकारला यासंदर्भात वेळोवेळी अपडेट्स देत असल्याची माहिती दिली आहे.

loading image