esakal | IPL 2021 : जडेजाच्या विक्रमी खेळीत धोनीचा हात

बोलून बातमी शोधा

MS Dhoni Ravindra Jadeja
IPL 2021 : जडेजाच्या विक्रमी खेळीत धोनीचा हात
sakal_logo
By
टीम ई सकाळ

IPL 2021 CSK vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात रविद्र जडेजाने अष्टपैलू खेळी केली. धोनीने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतल्यानंतर फाफ ड्युप्लेसीस आणि ऋतूराज गायकवाड या ओपनिंग जोडीने संघाला दमदार सुरुवात करुन दिली. या सामन्यात धोनीने जडेजाला बढती दिल्याचे पाहायला मिळाले. जड्डूनेही याचा पूरेपूर फायदा करुन घेत धावांची बरसात करुन दाखवली. त्याने हर्षल पटेलच्या ओव्हमध्ये केलेली फटकेबाजी ही आयपीएलमध्ये गेलच्या विक्रमाशी बरोबरी करणारी ठरली.

क्रीडा क्षेत्रातील अन्य बातम्यांसाठी येथे क्लिक करा

2011 च्या हंगामात ख्रिस गेलने कोच्ची टस्कर्स विरुद्धच्या सामन्यात एका ओव्हमध्ये 37 धावा कुटल्या होत्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळताना गेलने प्रशांत परमेश्वरनची धुलाई केली होती. त्याने 7 चेंडूत 37 धावा कुटल्या होत्या. जडेजाने हर्षल पटेलचा समाचार घेत एका ओव्हमध्ये सर्वाधिक धावांच्या गेलच्या विक्रमाशी बरोबरी केली. पटेलच्या षटकात धावांची बरसात करण्यासाठी धोनीचा सल्ला महत्त्वपूर्ण ठरला. खुद्द जडेजाने सामन्यानंतर यावर भाष्य केले.

हेही वाचा: कमिन्सनं जिंकलं! ऑक्सिजन खरेदीसाठी लाख मोलाची मदत

विराट कोहलीने ज्यावेळी हर्षल पटेलच्या हाती चेंडू सोपवला तेव्हा माहीने दिलेली गोष्ट कामी आली. हर्षल पटेलचा गेम प्लॅन ओळखून नॉन स्ट्राईकवर असलेल्या धोनीने जडेजाला खास सल्ला दिला होता. हर्षल पटेल ऑफ स्टम्पच्या बाहेर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करेल, असे धोनीने त्याला सांगितले होते.

जडेजा म्हणाला की, हर्षल ऑफ स्टम्पच्या बाहेर मारा करण्यावर भर देईल, असे सांगत यासाठी माही भाईने मला तयार केले. अखेरच्या षटकात ताकदीवर शॉट खेळण्याचा विचार होता. बॉल बॅटशी उत्तमपणे कनेक्ट करण्यात यशस्वी ठरलो. लास्टची ओव्हरमध्ये झालेल्या रन्स संघासाठी फायदेशीर होत्या, असेही तो म्हणाला. स्टाईक मिळाल्यानंतर मोठे शॉट खेळायचे हे फिक्स होते, असेही त्याने सांगितले.