esakal | IPL 2021: MI कॅप्टन रोहित, सूर्या-बुमराह UAE त पोहचले; फॅमिलीही सोबतच
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Indians

IPL 2021: MI कॅप्टन रोहित, सूर्या-बुमराह UAE त पोहचले; फॅमिलीही सोबतच

sakal_logo
By
सुशांत जाधव

IPL 2021 : इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा कसोटी सामना रद्द झाल्यानंतर भारतीय खेळाडू आयपीएलसाठी सज्ज होत आहेत. भारतीय संघाच्या ताफ्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर इंग्लंडहून आयपीएलसाठी युएईला जाण्याच्या प्लॅनमध्ये मोठा बदल झाला आहे. फ्रँचायझींनी आपापल्या खेळाडूंची व्यवस्था केल्याचे पाहायला मिळते. मुंबई इंडियन्सने कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांच्यासाठी Charter Flight ची व्यवस्था केली होती. खेळाडू आपल्या फॅमिलीसह मँचेस्टरहून आबूधाबीला रवाना झाले.

मुंबई इंडियन्स फ्रेंचायझीने खासगी विमानाने आपल्या खेळाडूंना युएईत आणले आहे. रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव हे मुंबई इंडियन्सचे खेळाडू इंग्लंडदौऱ्या आपल्या फॅमिलीसह गेले होते. तिथूनच हे खेळाडू आता फॅमिलीसह युएईत पोहचले आहेत. कोरोनाच्या नियमावलीनुसार मँचेस्टरमधून निघताना आणि युएईमध्ये पोहचल्यानंतर त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली असून त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आता या मंडळींना 6 दिवसांच्या अनिवार्य असलेल्या क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण करावा लागणार आहे.

हेही वाचा: IND vs ENG : इंग्लंडचा आडमुठेपणा; विराटचा प्रस्ताव नाकारला

मुंबई इंडियन्सशिवाय चेन्नई सुपर किंग्जच्या संघातील इंग्लंड दौऱ्यावर असलेले खेळाडूही शनिवारीच दुबईला पोहचणार आहेत. चेन्नई सुपर किंग्जचे CEO काशी विश्वनाथ यांनी एएनआयशी संवाद सांधताना याची माहिती दिली होती. दुसरीकडे विराट कोहली आणि सिराज रविवारी युएईला जाण्यास निघणार आहेत.

हेही वाचा: जे फेडरर-नदालला जमलं नाही ते जोकोविच करुन दाखवणार?

आयपीएलच्या 14 व्या हंगामातील पहिल्या टप्प्यातील स्पर्धा या भारतामध्ये झाल्या. कोरोनाच्या केसेस समोर आल्यानंतर स्पर्धा निम्म्यावरच स्थगित करावी लागली होती. त्यानंतर आता आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील सामने युएईच्या मैदानात रंगणार आहेत. 19 सप्टेंबर पासून मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्याने स्पर्धेला सुरुवात होणार आहे. इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघातील सपोर्ट स्टाफला कोरोनाची लागण झाल्यामुळे आयपीएल स्पर्धेवर याचा काय परिणाम होणार? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरेल.

loading image
go to top