esakal | IPL 2021 : नरेंद्र मोदी स्टेडियमवर राहुलचा फ्लॉप शो कायम!

बोलून बातमी शोधा

KL Rahul

IPL 2021 : नरेंद्र मोदी स्टेडियमवर राहुलचा फ्लॉप शो कायम!

sakal_logo
By
टीम ई सकाळ

आयपीएलच्या 14 व्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील नरेंद्र मोदी स्टेडियवरील सामन्यात लोकेश राहुल मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. पाच सामन्यात तीन अर्धशतके झळकावणाऱ्या लोकेश राहुलचा या मैदानातील रेकॉर्ड फारसा चांगला नाही. इंग्लंड विरुद्धच्या 4 टी-20 सामन्यात त्याने 15 धावा केल्या होत्या. यात तो दोनवेळा शून्यावर बाद झाला होता. नरेंद्र मोदी स्टेडियमवरील आपल्या रेकॉर्डमध्ये सुधारणा करणार का? याची चिंता पंजाब किंग्जचे बॅटिंग कोच वासीम जाफर यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केली होती.

क्रीडा क्षेत्रातील अन्य बातम्यांसाठी येथे क्लिक करा

अखेर तसेच चित्र पाहायला मिळाले. त्याने दोन चौकार आणि एरा षटकाराच्या मदतीने 20 बॉलमध्ये 19 धावा केल्या. पॅट कमिन्सने राहुलची विकेट घेतली. नरेंद्र मोदी स्टेडियमवर लोकेश राहुलने खेळलेल्या मागील पाच सामन्यात त्याच्या नावे 34 धावा आहेत. ही खेळी त्याच्या नावाला अशोभनिय अशीच आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवरील अनलकी फॅक्टर त्याची पाठ सोडणार की नाही? असा प्रश्नच आता उपस्थिती होताना दिसतोय. विस्डन इंडियाने राहुलच्या आतापर्यंतच्या सामन्यातील आकडेवारी शेअर केली आहे. ही आकडेवारी लोकेश राहुल पुढच्या मॅचमध्ये फिफ्टी करेल, असे भविष्य वर्तवणारी दिसते.

हेही वाचा: IPL 2021 : जडेजाच्या विक्रमी खेळीत धोनीचा हात

आयपीएलच्या पहिल्या सामन्यात लोकेश राहुलने 91 धावा केल्या होत्या. त्यानंतरच्या सामन्यात तो अवघ्या 5 धावा करुन परतला. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात राहुलने 61 धावांची खेळी केली. चौथ्या सामन्यात 4 धावा करुन परतलेल्यानंतर त्याने पाचव्या सामन्यात नाबाद 60 धावांची खेळी केली होती. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात तो 19 धावांवर बाद झाला. एक मॅचनंतर तो फिफ्टी करत असल्यामुळे सहाव्या सामन्यात तो अर्धशतकी खेळी करेल, अशी भविष्यवाणी विस्डन इंडियाने आपल्या ट्विटच्या माध्यमातून केले आहे.