esakal | PBKS vs RCB: विराटसमोर त्याचा 'लाडला' जिंकला!

बोलून बातमी शोधा

PBKS
PBKS vs RCB: विराटसमोर त्याचा 'लाडला' जिंकला!
sakal_logo
By
टीम ई सकाळ

IPL 2021, Punjab vs Bangalore, 26th Match : अहमदाबादच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात विराटचा लाडला अर्थात लोकेश राहुल किंग कोहलीवर भारी पडला. पंजाब किंग्जने हा सामना 34 धावांनी जिंकला. पहिल्यांदा बॅटिंग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसमोर 180 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावाचा पाठलाग करताना कोहलीचा संघ संघर्ष करताना पाहायला मिळाले. पदिक्कल अवघ्या 7 धावा करुन परतल्यानंतर विराट कोहलीने 35 धावा करुन मैदान सोडले. रजद पाटीदार 30 चेंडूत 31 तर हर्षल पटेल 13 चेंडूतील 31 आणि जेमिसनच्या 16 धावा वगळता कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा पार करता आला नाही. निर्धारित 20 षटकात बंगळुरुच्या संघाला 8 गड्यांच्या मोबदल्यात 145 धावांपर्यंतच मजल मारता आली.

हेही वाचा: IPL 2021: राहुलने दाखवला क्लास; RCB विरुद्ध खास रेकॉर्ड

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पंजाब आणि बंगळुरु यांच्यात लढत रंगली होती. विराट कोहलीने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यांदा बॅटिंग करताना लोकेश राहुलसोबत प्रभसिमरनने पंजाबच्या डावाची सुरुवात केली. हा प्रयोग फारसा यशश्वी ठरला नाही. जेमीसनने त्याची विकेट घेतली. तो 7 धावा करुन परतला. कर्णधार केएल राहुलच्या 57 चेंडूतील नाबाद 91 धावा आणि ख्रिस गेलने 24 चेंडूत कुटलेल्या 46 धावांच्या जोरावर पंजाब किंग्जने निर्धारित 20 षटकात 5 बाद 179 धावा केल्या होत्या. गेल बाद झाल्यानंतर कर्णधाराला साजेसा खेळ करत राहुल शेवटपर्यंत लढला. अखेरच्या टप्प्यात हरप्रित ब्रार याने त्याला 17 चेंडूत 25 धावा करुन संघाच्या खात्यात मोलाच्या धावा जोडल्या. निकोलस पूरन आणि शाहरुख खानला खातेही उघडता आले नाही. दीपक हुड्डाही केवळ 5 धावांची भर घालून माघारी फिरला.

  • 118-5 : युजवेंद्र चहलने संघाला मिळवून दिली पाचवी विकेट, शाहरुख खान शून्यावर बाद

  • 117-4 : दीपक हुड्डा 5 धावांची भर घालून माघारी, शहाबाज अहमदने घेतली विकेट

  • 107-3 : निकोलस पूरन खातेही न उघडता माघारी

  • 99-2 : 24 चेंडूत 46 धावांची खेळी करुन गेल माघारी, डॅनियल सॅम्सला मिळाले यश

  • 19-1 : प्रभसिमरन 7 चेंडूत 7 धावा करुन परतला माघारी, जेमिसनला मिळाली विकेट

Royal Challengers Bangalore XI: विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पदिक्कल, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, एबी डिव्हिलियर्स, एस अहमद, कायले जेमिसन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल.

Punjab Kings (Playing XI): केएल राहुल (यष्टीरक्षक/ कर्णधार), ख्रिस गेल, दीपक हुड्डा, निकोलस पूरन, प्रभसिमरन सिंग, शाहरुख खान, क्रिस जार्डन, हरप्रित ब्रार, रवि बिश्नोई, मोहम्मद शमी, रिलेय मेरेडिथ.

विराट कोहलीने टॉस जिंकून घेतला गोलंदाजी करण्याचा निर्णय