esakal | IPL 2021: राहुलने दाखवला क्लास; RCB विरुद्ध खास रेकॉर्ड

बोलून बातमी शोधा

KL Rahul
IPL 2021: राहुलने दाखवला क्लास; RCB विरुद्ध खास रेकॉर्ड
sakal_logo
By
टीम ई सकाळ

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर फ्लोप शोचा दुष्काळ संपवत केएल राहुलने (KL Rahul) विराट कोहलीच्या (Virat Kohali) RCB विरुद्ध खास रेकॉर्ड आपल्या नावे केला. बॅटिंगचा क्लास काय असतो याचा उत्तम नमुना त्याने दाखवून दिला. आपला नेहमीचा जोडीदार नसताना नव्या जोडीदारासोबत त्याने संघाच्या डावाला सुरुवात केली. आरसीबी विरुद्धच्या सामन्यात नाबाद 284 धावा करण्याचा खास विक्रम त्याने आपल्या नावे नोंदवलाय. आपल्या या विक्रमी खेळीत त्याने 17 षटकार आणि 22 चौकार खेचले आहेत.

हेही वाचा: IPL 2021 : मेनन यांची स्पर्धेतून माघार; ऑस्ट्रेलियन अंपायरवर नामुष्की

अहमदाबादच्या मैदानात केएल राहुलने 57 चेंडूत 91 धावांची खेळी केली. तो शेवटपर्यंत नाबाद राहिला. या खेळीत त्याने 7 चौकार आणि 5 षटकार खेचले. केएल राहुल RCB विरुद्धच्या मागील चार सामन्यात 326 धावा केल्या होत्या. 4 पैकी 3 डावात राहुल नॉट आउट राहिलाय. या खेळीत त्याच्या नावे एका शतकासह दोन स्फोटक अर्धशतकाचा समावेश आहे.

अखेरच्या षटकात कुटल्या 22 धावा

पंजाब किंग्जने रॉयल चॅलेजर्स विरुद्धच्या सामन्यात 20 ओव्हरमध्ये 5 गड्यांच्या मोबदल्यात 179 धावा केल्या. यात केएल राहुलने मोलाची कामगिरी बजावली. क्रिस गेलसोबत त्याने अर्धशतकी भागीदारी केली. पण गेलने साथ सोडल्यानंतर राहुलने एक बाजू सांभाळली. ठराविक अंतराने विकेट पडत असताना तो शेवटपर्यंत खेळला. अखेरच्या षटकार लोकेश राहुलने 22 धावा केल्या. त्यामुळे पंजाबने त्यांच्यासमोर 180 धावांचे टार्गेट ठेवले.