esakal | धिप्पाड गेलसमोर काडी पैलवान चहलचा बॉडी बिल्डिंग शो

बोलून बातमी शोधा

RCB vs PBS
धिप्पाड गेलसमोर काडी पैलवान चहलचा बॉडी बिल्डिंग शो
sakal_logo
By
सुशांत जाधव

पंजाब किंग्ज (PBKS) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) यांच्यातील लढतीमध्ये लोकेश राहुलने नरेंद्र मोदी स्टेडियमवरील आपला खराब कामिगिरी संपुष्टात आली. त्याच्या 91 धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर पंजाबने सामनाही जिंकला. विराट कोहली, मॅक्सवेल आणि एबी या तिकडीच्या अपयशामुळे संघावर 36 धावांनी पराभूत होण्याची नामुष्की ओढावली. या सामन्यातील विजयासह पंजाब किंग्जने पाँइट टेबलमधील पाचवे स्थान कायम राखले. या सामन्यातील पंजाबच्या खेळाडूंच्या धमाकेदार कामगिरीशिवाय संघातील खेळाडूंच्या काही फनी मुव्हेमेंट्स पाहायला मिळाल्या. ख्रिस गेल आणि युजवेंद्र चहल यांचा शर्टलेस फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.

क्रीडा क्षेत्रातील बातम्यांसाठी येथे क्लिक करा

सामना जिंकल्यानंतर पंजाब किंग्ज संघाने अधिकृत ट्विट अकाउंटवरुन एक फोटो शेअर करुन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची चांगलीच गंमत केलीय. त्यांनी शेअर केलेल्या फोटोत ख्रिस गेल आणि (Chris Gayle) आणि युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) शर्टलेस (Shirtless) दिसत आहेत. धिप्पाड गेल आणि काडी पैलवान वाटणारा युजवेंद्र चहल बॉडी बिल्डिंगमधील पोझ देताना दिसतोय. PBKS ने या फोटोला खास कॅप्शनही दिले आहे. या फोटातून दोन्ही संघातील लढतीत कोण भारी होते, हे या फोटोतून दिसून येते, असे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा: IPL 2021: राहुलने दाखवला क्लास; RCB विरुद्ध खास रेकॉर्ड

गेल हा पंजाबचा खेळाडू असून युजवेंद्र चहल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळतो. पंजाबने दिलेल्या धावांचे आव्हान पाठलाग करताना बंगळुरुची अवस्था खूपच केविलवाणी झाली होती. तगड्या फलंदाजांना स्वस्तात माघारी धाडत पंजाबने आपली ताकद दाखवून दिली. गेलने या सामन्यात 24 चेंडूत 46 धावा कुटल्या होत्या. दुसरीकडे युजवेंद्र चहलने 4 ओव्हरमध्ये 34 धावा खर्च करुन एक विकेट घेतली होती. त्याने शाहरुख खानला खातेही उघडू दिले नव्हते. गेल आणि चहलचा फोटो व्हायरल झाला असून काही लोक चहलला ट्रोलही करताना दिसते.