esakal | IPL 2021 : स्पर्धेत झाली सट्टेबाजी? दोघांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

IPL

IPL 2021 : स्पर्धेत झाली सट्टेबाजी? दोघांना अटक

sakal_logo
By
टीम ई सकाळ

बायो-बबलच्या सुरक्षा कवचाला तडा गेल्यानंतर आयपीएल स्पर्धा (IPL 2021) स्थगित करण्यात आली. स्पर्धेसाठी करण्यात आलेल्या नियोजनासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थितीत होत असताना आता आयपीएलच्या सामन्यादरम्यान सट्टेबाजी झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. भारतीय क्रिकेट मंडळाच्या (BCCI) भ्रष्टाचारविरोधी पथकाचे (ACU) प्रमुख शब्बीर हुसैन शेखदम खंडवावाला यांनीच सट्टेबाजी (bookies) झाल्याचा संशय व्यक्त केलाय. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवरील सफाई कर्मचाऱ्याने 'पिच-सिडिंग' च्या माध्यमातून सट्टेबाजांना मदत केल्याचे बोलले जात आहे. मॅच आणि टेलिव्हिजनवरील प्रक्षेपण यांच्यातील अंतराचा फायदा उठवण्यासाठी मैदानातील व्यक्ती टेलिव्हजनवरील प्रसारणापूर्वीच सट्टेबाजांना माहिती देत असतो.

हेही वाचा: IPL स्थगित झाल्याने BCCIला २२०० कोटींचा फटका

खंडवाला यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाच्या एका अधिकाऱ्याने याप्रकरणात एकाला पकडण्याचा प्रयत्न केला. पण ती व्यक्ती हातून निसटण्यास यशस्वी ठरली. संशयीत आरोपी दोन्ही मोबाईल फोन टाकून पसार झाला असून या व्यक्तीसंदर्भातील माहिती दिल्ली पोलिसांना कळवण्यात आलीये. ACU ने तक्रार दाखल केलीय. याशिवाय दिल्ली पोलिसांनी कोटला येथून याच प्रकरणात दोघांना अटक केली आहे. राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात 2 मे रोजी सामना झाला होता. अटक करण्यात आलेल्या व्यक्ती बोगस ओळखपत्रासह पकडल्या गेल्या.

हेही वाचा: IPL 2021: स्पर्धा रद्द झाल्यास खेळाडूंना फुल्ल सॅलरी मिळणार?

हुसैन यांनी दिलेल्या माहितीनुसर, 'दोन वेगवेगळ्या दिवशी हे लोक कोटलामध्ये पोहचण्यात यशस्वी ठरले. जो पळून जाण्यात यशस्वी ठरला तो मैदानात सफाई कर्मचारी बनून आला होता. आमच्याकडे त्याचे संपूर्ण विवरण आहे. त्याचा आधार कार्ड आणि संपूर्ण माहिती दिल्ली पोलिसांना देण्यात आली आहे. पुढील दोन दिवसात या व्यक्तीला अटक करण्यात येईल, असा विश्वास हुसैन यांना व्यक्त केलाय. संबंधित व्यक्त हजारो रुपयाच्या मोबदल्यात काम करणारा एखादा छोटा मोहरा असेल. त्याच्यामागे बड्या व्यक्तीचे हात असू शकतात, असेही त्यांनी म्हटले आहे.