esakal | IPL 2021 : मोदी स्टेडियमवर दिल्लीकरांचा रुबाब!

बोलून बातमी शोधा

DC vs KKR

कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्ससमोर 155 धावांचे आव्हान ठेवले होते.

IPL 2021 : मोदी स्टेडियमवर दिल्लीकरांचा रुबाब!

sakal_logo
By
टीम ई सकाळ

Delhi vs Kolkata, 25th Match : पृथ्वी शॉनं 41 चेंडूत केलेली 82 धावांची धमाकेदार खेळी आणि शिखर धवनने 46 धावा करुन त्याला दिलेली सुरेख साथ याच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने दिमाखदार विजय नोंदवला. कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्ससमोर 155 धावांचे आव्हान ठेवले होते. दिल्लीने 7 गडी राखून 17 व्या षटकातच लक्ष्य पार केले. धवन-शॉ जोडीने पहिल्या विकेटसाठी 132 धावांची खेळी केली. कमिन्सने धवनच्या रुपात संघाला पहिले यश मिळवून दिले. पृथ्वी शॉ आणि रिषभ पंत या दोघांनाही कमिन्सनेच बाद केले. स्टॉयनिस नाबाद 6 आणि हेटमायर 0 यांनी 16.3 षटकात संघाला विजय मिळवून दिला.

हेही वाचा: IPL 2021 : मेनन यांची स्पर्धेतून माघार; ऑस्ट्रेलियन अंपायरवर नामुष्की

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत याने टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. शुभमन गिल आणि नितीश राणा या जोडीने कोलकाताच्या डावाची सुरुवात केली. धावफलकावर अवघ्या 25 धावा असताना नितीश राणा अक्षरच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला. पुढे येऊन मारण्याचा त्याचा अंदाज चुकला आणि विकेट किपर रिषभ पंतने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. राहुल त्रिपाठी- शुभमन गिल या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 44 धावांची भागीदारी केली. ही जोडी आवेश खानने फोडली. शुभमन गिलला त्याने 43 धावांवर बाद केले. ललित यादवने कोलकाताचा कर्णधार इयॉन मॉर्गनला खातेही उघडू दिले नाही. नरेनलाही त्याने आल्या पावली माघारी धाडले. अखेरच्या षटकात आंद्रे रसेलने 27 चेंडूत 45 धावांची खेळी केली. कार्तिकने 10 चेंडूत 14 धावा केल्या. कमिन्सने संघाच्या धावसंख्येत 11 धावांची भर घातली.