esakal | IPL 2021; PBKS vs CSK: वानखेडेवर जडेजा-चाहरची हवा!
sakal

बोलून बातमी शोधा

IPL 2021 : CSK चा विजयी 'दीप'; पंजाबची निघली हवा!

IPL 2021 : CSK चा विजयी 'दीप'; पंजाबची निघली हवा!

sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

IPL 2021, Punjab vs Chennai, 8th Match दिपक चाहरचा भेदक मारा, जडेजाची जबऱ्या फिल्डिंग आणि मोईन अलीच्या फटकेबाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला. वानखेडेच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात टॉस जिंकून महेंद्र सिंह धोनीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिपक चाहरने कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत पंजाबच्या आघाडीला सुरुंग लावला. शाहरुख खानने केलेल्या 47 धावांच्या खेळीच्या जोरावर पंजाबने कशा बशा 106 धावा केल्या. या धावांचा पाठलाग सहज करत चेन्नई सुपर किंग्जने 6 विकेट आणि 24 चेंडू राखून विजय नोंदवला.

पंजाबने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जची सुरुवातही खराब झाली. ऋतूराज गायकवा 5 धावा करुन माघारी फिरला. त्यानंतर मैदानात आलेल्या मोईन अलीने फाफ ड्युप्लेसीससोबत 66 धावांची भागीदारी केली. तो 31 चेंडूत 46 धावा करुन माघारी फिरला. एम. अश्विनने त्याची विकेट घेतली. शमीने सुरेश रैना (8) अंबाती रायडूला शून्यावर तंबूत धाडले. फाफच्या नाबाद 36 धावा आणि सॅम कुरेन नाबाद 5 धावा करत चेन्नईला विजयावर शिक्कामोर्तब केले. पंजाबकडून मोहम्मद शमीने 2 तर एम अश्विन आणि रिचर्डसन यांनी एक- एक विकेट घेतली.

IPL 2021 : जड्डूची कमाल; गेलचा झेल आणि राहुलचा गेम (VIDEO)

तत्पूर्वी केएल राहुल आणि मयांक अग्रवाल यांनी पंजाबच्या डावाला सुरुवात केली. चाहरने मयांकला खातेही उघडू दिले नाही. राहुल 5 धावांवर रन आउट झाला. गेल आणि दिपक हुड्डालाही राहुल चाहरनेच बाद केले. दोघांनी प्रत्येकी 10-10 धावा केल्या. चाहच्याच गोलंदाजीवर निकोलस पूरन झेलबाद झाला. शाहरुख खानने 36 चेंडूत 47 धावा केल्यामुळे पंजाबने शंभरी पार केली. सॅम कुरेनने त्याच्या खेळीला ब्रेक लावला. तळाच्या फलंदाजीत रिचर्डसनने 22 चेंडूत 15 धावा केल्या. मोईन अलीने त्याला बाद केले. एम अश्विन 6 धावा करुन परतल्यानंतर मोहम्मद शमीच्या नाबाद 9 धावांच्या जोरावर पंजाबने निर्धारित 20 षटकात 106 धावा केल्या होत्या.

99-4 : अंबाती रायडूला शमीने खातेही उघडू दिले नाही

99-3 : शमीने रैनाची 8 धावांवर बाद केले

90-2 : मोईन अलीने 31 चेंडूत 46 धावांची खेळी केली, एम अश्विने त्याची विकेट घेतली

24-1 : अर्शदीप सिंगने ऋतूराज गायकवाडला स्वस्तात धाडले माघारी, त्याने 16 चेंडूत 5 धावांची भर घातली

101-8 : पंजाबकडून सर्वोच्च धावसंख्या करणाऱ्या शाहरुखची सॅम कुरेनने घेतली विकेट, त्याने 36 चेंडूत 47 धावा केल्या

87-7 : एम अश्विन 14 चेंडूत 6 धावा करुन बाद, ब्रावोला मिळाली विकेट

57-6 : मोईन अलीने जाय रिचर्डसनला 15 धावांवर धाडले माघारी

IPL 2021 : CSK ला विजयाचे कवडसे दाखवणारा 'दीप'

26-5 : दिपक हुड्डाही दिपक चाहरचा शिकार, तो 10 धावा करुन परतला

19-4 : निकोलस पुरनला दिपक चाहरने खातेही उघडू दिले नाही

19-3 : दिपक चाहरने स्फोटक फलंदाज क्रिस गेलही धाडले माघारी, रविंद्र जडेजाने घेतला अप्रतिम झेल

15-2 : केएल राहुल रन आउट, रविंद्र जडेजाने डायरेक्ट थ्रो करत घेतली विकेट

1-1 : दिपक चाहरने मयांकला खातेही उघडू दिले नाही

असे आहेत दोन्ही संघ

Punjab Kings (Playing XI): केल राहुल (यष्टीरक्षक /कर्णधार, मयांक अग्रवाल, क्रिस गेल, दिपक हुड्डा, निकोलस पूरन, शाहरुख खान, जाए रिचर्डसन, मुर्गन अश्विन, रियले मेरडिथ, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग.

Chennai Super Kings (Playing XI): ऋतूराज गायकवाड, फाफ ड्युप्लेसीस, सुरेश रैना, मोईन अली, अंबाती रायडू, एमएस धोनी (यष्टीरक्षक/कर्णधार, रविंद्र जडेजा, सॅम कुरेन, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर.

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून घेतला बॉलिंग करण्याचा निर्णय