esakal | RCB vs CSK : जडेजाने केली युवी-गेलची बरोबरी; एका ओव्हरमध्ये 36 धावांचा धमाका (VIDEO)

बोलून बातमी शोधा

Ravindra Jadeja
RCB vs CSK : जडेजाने केली युवी-गेलची बरोबरी; एका ओव्हरमध्ये 36 धावांचा धमाका (VIDEO)
sakal_logo
By
सुशांत जाधव

विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात रविंद्र जडेजाने तुफानी अर्धशतक झळकावले. उत्तुंग षटकार खेचून फिफ्टी पूर्ण करणाऱ्या रविंद्र जडेजाने 28 चेंडूत 62 धावा कुटल्या. यात 4 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता. बंगळुरुकडून अखेरची ओव्हर टाकणाऱ्या हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर त्याने सलग चार षटकार ठोकले. अखेरच्या चेंडूवर ताकद थोडी कमी पडली. आणि त्याला बाउंड्री मिळाली.

चेन्नईच्या धावफलकावर 111 धावा असताना 14 व्या षटकाती पाचव्या चेंडूवर हर्षल पटेलने फाफ ड्युप्लेसीसला माघारी धाडले. त्यानंतर महेंद्र सिंह धोनीने रविंद्र जडेजाला बढती दिली. या संधीच त्याने सोनं केले. 28 चेंडूत 62 धावांची धमाकेदार नाबाद खेळीत अखेरच्या षटकात कुटलेल्या 36 धावा + (नो बॉलच्या स्वरुपातील एक धाव अवांतर) प्रतिस्पर्धी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे टेन्शन वाढवणाऱ्या ठरु शकतात.

टी 20 क्रिकेटमध्ये एका ओव्हरमध्ये 36 धावा करणारा रविंद्र जडेजा हा सातवा फलंदाज ठरलाय. यापूर्वी युवराज सिंग, ख्रिस गेल, रॉस व्हाइटली. केरॉन पोलार्ड, हजरतुल्ला झझाई आणि लिओ कार्टर यांनी एका ओव्हरमध्ये 36 धावा करण्याचा पराक्रम केला होता.