esakal | IPL Record : 360 डिग्री एबी ठरला 'फास्टर फॉरेनर'
sakal

बोलून बातमी शोधा

ab devilliers

IPL Record: 360 डिग्री एबी ठरला 'फास्टर फॉरेनर'

sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) संघाचे सुरुवात खराब झाली. कर्णधार विराट कोहली 12 (11), देवदत्त पदिक्कल 17 (14) आणि मॅक्सवेल 20 (25) धावा करुन परतल्यानंतर अडचणीत सापडलेल्या संघाचा डाव एबीने सावरला. त्याने रजत पाटीदारच्या साथीने 54 धावांची भागीदारी केली. पाटीदार 22 चेंडूत 31 धावा करुन परतल्यानंतर एबी शेवटपर्यंत खेळला. त्याने 42 चेंडूत 3 चौकार आणि 5 षटकाराच्या मदतीने नाबाद 75 धावांची खेळी केली. त्याच्या दमदार खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 5 गड्यांच्या मोबदल्यात 171 धावांपर्यंत मजल मारली.

हेही वाचा: IPL 2021 : ऑसी खेळाडूंसंदर्भात PM म्हणाले; तुमचं तुम्ही बघा!

या खेळीसह एबी डिव्हिलियर्सने आयपीएल स्पर्धेत 5000 धावांचा टप्पा पार केला. यासाठी त्याने 3288 चेंडूंचा सामना केला. यापूर्वी सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने 3555 चेंडूत पाच हजारीचा टप्पा पार केला होता. वॉर्नरला मागे टाकत एबी आता सर्वात जलद 5000 धावांचा टप्पा पार करणारा परदेशी फलंदाज ठरलाय.

दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर शिखर धवनने पाच हजार धावांचा टप्पा पार करण्यासाठी 3956 चेंडू खेळले होते. सुरेश रैनाने 3615 चेंडूचा सामना करताना 5000 धावांचा टप्पा सर केला होता. मुंबई इंडियन्सच्या संघाला पाचवेळा जेतेपद मिळवून देणारा हिटमॅनने यासाठी 3817 चेंडू खेळले होते.

loading image