esakal | फारच कठीण सामना जिंकला : कोहली
sakal

बोलून बातमी शोधा

RCBvsSRH

फारच कठीण सामना जिंकला : कोहली

sakal_logo
By
सुनंदन लेले : सकाळ वृत्तसेवा

चेपॉकच्या विकेटने दोन्ही संघांतील फलंदाजांची कठीण परीक्षा बघितली. ही विकेट पुढच्या सामन्यांमध्ये अजून कठीण होत जाणार असा माझा अंदाज आहे. मुंबई वि. कोलकाता सामन्यातून समजले होते की अशा विकेटवर तुम्ही सामन्यातून कधीच बाहेर फेकले जात नाही. माझ्या संघात गोलंदाजीकरता भरपूर पर्याय होते ज्याचा फरक पडला, असे मत निसटता विजय मिळालेल्या बंगळूर संघाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले.

१४९ धावा कमी नाहीत, इतकाच स्पष्ट संदेश मी गोलंदाजी करायला जाण्याअगोदर सहकाऱ्‍यांना दिला होता. आपल्याला जर एवढ्या धावा करणे कठीण गेले तर तीच अडचण त्यांची आपल्याला करता येईल असे मी सांगितले. चेंडू जुना झाल्यावर फटके मारणे कठीण गेले. म्हणून मॅक्सवेलची खेळी मोलाची ठरली, असेही विराटने सांगितले.

हेही वाचा: IPL 2021, DCvsRR - महागड्या खेळाडूनं दिला फिनिशिंग टच

पाच षटकांतील खराब खेळीने घात केला : बेलीस

४० पैकी ३५ षटके आम्ही उत्तम खेळ केला होता. शेवटच्या ५ षटकांमधील खराब खेळाने बंगळूरविरुद्धच्या सामन्यात आमचा घात केला. गोलंदाजी करताना आम्ही त्यांच्या धावा अजून कमी करू शकलो असतो. फलंदाजी करताना पळून धावा काढण्यावर भर देऊन स्ट्राईक रोटेट करून सामना जिंकू शकलो. त्यातून एका षटकात तीन फलंदाज बाद झाल्याने दडपण खूप वाढले. त्यात दडपणाखाली चुका होत राहिल्या. या चुकांमधून लवकर शिकतील, अशी आशा हैदराबाद संघाच्या ट्रॅव्हल बेलीस यांनी व्यक्त केली.

शाहबाजची कमाल : सिराज

विकेट संथ होती आणि त्यावर डावखुरा फिरकी गोलंदाज त्रास देऊ शकेल हा विराट कोहलीचा अंदाज बरोबर होता. शाहबाजने मिळालेल्या संधीचे सोने केले. तीन प्रमुख फलंदाजांना एका षटकात बाद केल्याने शाहबाजने सामन्याला कलाटणी दिली, असे सिराजने सांगितले.