IPL 2021 : चिन्ना थाला अन् अनटोल्ड स्टोरी!

रैना आणि धोनी यांच्यातील मैत्री शब्दांत सांगण्यापलीकडची आहे.
MS Dhoni And Suresh Raina
MS Dhoni And Suresh RainaTwitter
Updated on

IPL 2021 : चेन्‍नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) चा स्टार अष्टपैलू सुरेश रैना (Suresh Raina) आणि धोनी यांच्यातील मैत्री शब्दांत सांगण्यापलीकडची आहे. काही दिवसांपूर्वीच रैनाने आपल्या आत्मचरित्रातून काही गोष्टी मनमोकळे पणाने मांडल्या होत्या. यात धोनीचाही खास उल्लेख करण्यात आला होता. रैनाने 'बिलिव्ह : व्हॉट लाईफ अँड क्रिकेट टॉट मी....(Believe: What life and cricket taught me) या आपल्या आत्मचरित्राची कॉपी धोनीला भेट म्हणून दिल्याचे पाहायला मिळाले. चेन्नई सुपर किंग्जने आपल्या अधिकृत अकाउंटवरुन यासंदर्भातील फोटो शेअर केलाय. या फोटोला चिन्ना थाला आणि द अनटोल्ड स्टोरी, असे खास कॅप्शन देण्यात आले आहे.

सुरेश रैनाने आपल्या आत्मचरित्रात धोनीसोबतच्या नात्यावरही भरभरुन लिहिले आहे. धोनी भाई नेहमीच माझी गंमत करत असतो. जर मी रुममध्ये असेल तर काही ना काही मोडतोड घडत असते, असे धोनी भाई मानतो. त्याच्या या गोष्टी सत्यही असतील, असा उल्लेख रैनाने आपल्या पुस्तकात केलाय.

MS Dhoni And Suresh Raina
Video: इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोने टिपला राहुलचा भन्नाट झेल!

आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धेसाठी CSK चा ताफा सज्ज

आयपीएलच्या 14 व्या हंगामातील पहिल्या टप्प्यात भारतात झालेल्या स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जने दमदार कामगिरी केलीये. त्यांनी 7 पैकी 5 सामन्यातील विजयासह 10 गुण मिळवत गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे. कामगिरीतील सातत्य कायम राखण्यासाठी ते प्रयत्नशील असतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीच्या हंगामातील संपूर्ण स्पर्धा युएईत झाली होती. यावेळी आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच चेन्नईची कामगिरी खालावल्याचे चित्र पाहायला मिळाले. धोनीच्या नेतृत्वाखालील संघ प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरला होता. ही कामगिरी विसरुन पुन्हा एकदा जेतेपद पटकावण्याच्या इराद्याने टीम मैदानत उतरेल.

MS Dhoni And Suresh Raina
ग्लोव्ह्जला टेप लावून पंतची चिटिंग? जाणून घ्या नियम

आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या लढतीमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा संघ मुंबई इंडियन्सशी भिडणार आहे. 19 सप्टेंबरला हा हायमेगा होल्टेज सामना रंगणार आहे. या स्पर्धेतील अंतिम लढत 15 ऑक्टोबरला खेळवण्यात येणार असून या दोन्ही संघाशिवाय दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अंतिम फेरीपर्यंत मजल मारण्यासाठी प्रयत्नशील असतील.

चेन्‍नई सुपरकिंग्जचे संपूर्ण वेळापत्रक

19 सप्टेंबर 2021 चेन्‍नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स सायंकाळी 7:30 वाजता, दुबई

24 सप्टेंबर 2021 चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सायंकाळी 7:30 वाजता, शारजा

26 सप्टेंबर 2021 चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स दुपारी 3:30 वाजता , अबुधाबी

30 सप्टेंबर 2021 चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सायंकाळी 7:30 वाजता, शारजा

2 ऑक्टोबर 2021 चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स सायंकाळी 7:30 वाजता, अबुधाबी

4 ऑक्टोबर 2021 चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सायंकाळी 7:30 वाजता, दुबई

7 ऑक्टोबर 2021 चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज दुपारी 3:30 वाजता ,दुबई.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com