esakal | सूर्या तिला नेमकं काय सांगतोय? सोशल मीडियावर फोटो व्हायरल

बोलून बातमी शोधा

Suryakumar Yadav AND Devisha
सूर्या तिला नेमकं काय सांगतोय? सोशल मीडियावर फोटो व्हायरल
sakal_logo
By
सुशांत जाधव

आयपीएलच्या हंगामात विक्रमी जेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या संघाने दिल्लीतील अरुण जेटली मैदानात पराभवाची मालिका खंडीत केली. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने 7 विकेट्स राखून एकहाती विजय नोंदवला. राजस्थान रॉयल्सच्या संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना 20 ओव्हर्समध्ये 171 धावा केल्या होत्या. सलामीवीर क्विंटन डिकॉक आणि पोलार्डने 18.3 ओव्हमध्येच हे लक्ष्य पार केले.

या सामन्यात स्टार आणि अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या सुर्यकुमार यादवला मैदानात फार काळ तग धरता आला नाही. तो 10 बॉलमध्ये 16 धावा करुन तंबूत परतला. विनिंग इनिंग खेळता आली नसली तरी सोशल मीडियावर त्याच्या नावाचा बोलबाला सुरुय. मुंबईच्या विजयानंतर सूर्या आणि त्याच्या पत्नीचा फोटो चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन हा फोटो शेअर केला आहे.

त्याने अनोख्या अंदाजात सेलिब्रेशन केले. व्हिआयपी गॅलरीमध्ये मॅच पाहण्यासाठी बसेलेल्या पत्नीला तो काहीतरी सांगताना दिसत आहे. दोघांच्यामध्ये प्रॉटेक्टेड ग्लास दिसत असून कान देऊन सूर्याच्या मनातील गोष्ट पत्नी देविशा शेट्टी ऐकताना दिसते. काहीजण या दोघांच्या या फोटोवर रोमँण्टिक कमेंट्स देत आहेत.

हेही वाचा: MIvsRR : मुंबई जिंकली; रितिकावर फिरला कॅमेरा (VIDEO)

झहीर खानची पत्नी सागरिका घाटगे हिने देखील सूर्या आणि देविशा यांचा क्वूट फोटो शेअर केला आहे. तिने शेअर केलेल्या फोटोवर अनेक प्रतिक्रिया उमटत असून मुंबईच्या विजयानंतर सूर्या पत्नीला किस करत असून प्रोटेक्टेड ग्लासच्या मागे असलेली देविशा आपले गाल त्याच्याकडे करते, असा तर्कही काहीजण लावत आहेत. देविशाने मास्कही घातले असून सूर्या या फोटोत मास्कशिवाय दिसतो.