esakal | मुंबई जिंकली; रितिकावर फिरला कॅमेरा (VIDEO)

बोलून बातमी शोधा

Ritika Sajdeh

आयपीएलमधील मुंबईच्या प्रत्येक मॅचेला रितिकाची उपस्थिती दिसते. रोहितची धमाकेदार खेळी आणि मुंबईचा विजयानंतर तिच्या चेहऱ्यावरील भाव पाहण्याजोगे असतात.

MIvsRR : मुंबई जिंकली; रितिकावर फिरला कॅमेरा (VIDEO)
sakal_logo
By
टीम ई सकाळ

दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सची गाडी पुन्हा रुळावर आली. चेन्नईच्या मैदानातील संघर्षानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सला (Rajasthan Royals) 7 विकेट्सनी पराभूत केले. मुंबई इंडियन्सचा स्पर्धेतील हा तिसरा विजय ठरला. 6 सामन्यातील 3 विजयासह मुंबईच्या खात्यात आता 6 गुण जमा झाले आहेत. क्विंटन डिकॉकने या सामन्यात मॅच विनिंग खेळी केली.

हेही वाचा: IPL 2021 : क्विंटन डिकॉकची नाबाद फिफ्टी; MI ने मारली बाजी

पॉलार्डच्या साथीने डिकॉकने मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. आयपीएलच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन मॅचनंतरच्या मुव्हमेंट्सचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. पोलार्डने विनिंग शॉट खेळल्यानंतर दोघांनी गळाभेट घेतल्याचे दिसते. व्हिआयपी प्रेक्षक गॅलरीत बसलेली रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह आपल्या जागेवर उभा राहून टाळ्या वाजवत मुंबई इंडियन्सच्या विजयाचा आनंद साजरा करतानाही दिसते. या सामन्यात कृणाल पांड्यानेही महत्त्वपूर्ण खेळी केली. एका ओव्हरमध्ये 12 धावा खर्च केलेल्या कृणालने 26 चेंडूत 2 चौकार आणि षटकाराच्या मदतीने 39 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

हेही वाचा: IPL 2021 : महिला चॅलेंज गेम फिस्कटणार

डग आउटमध्ये रोहित त्याच्यासोबत संघाच्या विजयाचा आनंद व्यक्त करताना पाहायला मिळाले. आयपीएलमधील मुंबईच्या प्रत्येक मॅचेला रितिकाची उपस्थिती दिसते. रोहितची धमाकेदार खेळी आणि मुंबईचा विजयानंतर तिच्या चेहऱ्यावरील भाव पाहण्याजोगे असतात. ज्यावेळी संघाच्या पदरी निराशा येते त्यावेळी ती हताश झाल्याचे पाहायला मिळाले आहे.