esakal | IPL 2021 : खूशखबर; प्रेक्षकांसाठी स्टेडियमचे उघडले दरवाजे!
sakal

बोलून बातमी शोधा

IPL 2021

IPL 2021 : खूशखबर; प्रेक्षकांसाठी स्टेडियमचे उघडले दरवाजे!

sakal_logo
By
सुशांत जाधव

आयपीएलच्या 14 व्या हंगामातील दुसऱ्या टप्प्यातील सामने युएईच्या मैदानात रंगणार आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गत हंगामाशिवाय यंदाच्या हंगामातील पहिल्या टप्प्यातील सामने प्रेक्षकांशिवायच रंगल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र 19 सप्टेंबरपासून पुन्हा एकदा स्टेडियमवर प्रेक्षकांची गजबज पाहायला मिळणार आहे.

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) यांच्यातील लढतीने दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानातून दुसऱ्या टप्प्यातील लढतींना सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी प्रेक्षकांना प्रवेश देण्यात येणार आहे.

हेही वाचा: VIDEO : बॉल आला अन् बॅटचे तुकडे करुन गेला; गेल हँग!

बीसीसीआयने बुधवारी यासंदर्भात मोठी अपडेट्स दिलीये. 16 सप्टेंबरपासून अधिकृत वेबसाइटवरुन क्रिकेट चाहते सामन्यांची तिकीट खरेदी करु शकतात, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. www.iplt20.com. या बेवसाइटशिवाय PlatinumList.net.या बेवसाईटवरुनही सामन्याची तिकीटे बुक करता येणार आहेत.

loading image
go to top