esakal | VIDEO : बॉल आला अन् बॅटचे तुकडे करुन गेला; गेल हँग!
sakal

बोलून बातमी शोधा

Chris Gayle

VIDEO : बॉल आला अन् बॅटचे तुकडे करुन गेला; गेल हँग!

sakal_logo
By
सुशांत जाधव

Caribbean Premier League 2021 : ड्वेन ब्रावोच्या नेतृत्वाखालील सेंट किट्स अँण्ड नेविस पॅट्रियोट्स संघाने निकोलस पूरनच्या गयाना अमेझॉनला वॉरियर्स संघाला पराभूत करत फायनल गाठली. सेंट किट्सच्या विजयात सलामीवर ख्रिस गेलचा धमाका पाहायला मिळाला. गयाना अमेझॉन वॉरियर्सने दिलेल्या 179 धावांचा पाठलाग करताना गेलनं एविन लुईसच्या साथीनं पहिल्या विकेटसाठी 7.2 षटकात 76 धावांची तगडी भागीदारी केली.

सलामी जोडीनं केलेल्या दमदार कामिगिरीच्या जोरावर सेंट किट्सने 7 गडी राखून सामना जिंकत फायनल गाठली. या सामन्यात गेलने 155.56 च्या सरासरीने 27 चेंडूत 42 धावा केल्या. दुसऱ्या बाजूला लुईसने 39 चेंडूत नाबाद 77 धावांची खेळी केली. यात त्याने 8 षटकार खेचले. आयपीएल किंवा वेस्ट इंडिज संघाकडून खेळताना मागील काही सामन्यांपासून तिसऱ्या क्रमांकावर खेळणाऱ्या गेल पुन्हा एकदा डावाची सुरुवात करताना दिसले. धावांचा पाठलाग करताना आपल्यातील धमाका दाखवून देत त्याने कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. सामन्यादरम्यान एक फटका खेळताना गेलची बॅट तुटल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा: "CSKने विकत घेतलं असलं तरी लगेच संघात जागा मिळलं असं समजू नको"

सेंट किट्सच्या डावातील चौथ्या षटकात ओडियन स्मिथच्या गोलंदाजीवर गेलच्या बॅटचे दोन तुकडे झाले. स्मिथनं वेगाने फेकलेल्या चेंडूवर प्रहार करताना बॅट आणि बॉलचा संपर्क झाला. पण दांडा हातात अन् बॅटचा उरलेला तुकडा मैदानात उडून पडल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा: IPL 2021: जाडेजा पाहतोय धोनीचा वारसदार होण्याचं स्वप्न!

कॅरेबियन प्रिमियर लीगच्या फायनलमध्ये आता सेंट किट्स अँण्ड नेविस पॅट्रियोट्ससमोर रहकिम कॉर्नवालच्या सेंट लुसिया किंग्जचे आव्हान असणार आहे. आयपीएलमध्ये रंगणाऱ्या फायनलमध्ये गेल आणि लुईस आपल्या संघासाठी दमदार कामगिरी करुन झोकात आयपीएल स्पर्धेसाठी युएईला रवाना होण्यासाठी सज्ज असतील.

loading image
go to top