esakal | पंत 'सुपर डुप्पर' नो बॉलही सोडत नसतो, एकदा हा VIDEO पाहाच

बोलून बातमी शोधा

DC VS SRH
पंत 'सुपर डुप्पर' नो बॉलही सोडत नसतो, एकदा हा VIDEO पाहाच
sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

IPL 2021, DCvsSRH : सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करताना दिल्ली कॅपिटल्सने 159 धावा केल्या. सलामीवीर पृथ्वी शॉ अर्धशतकी खेळीशिवाय दिल्ली संघाच्या आघाडीच्या गड्यांनी लक्षवेधी कामगिरी केली. त्याने 27 चेंडूत 4 चौकार आणि1 षटकारासह 37 धावांची उपयुक्त खेळी केली. कौलने त्याच्या खेळीला ब्रेक लावला. मॅचमधील डावातील 13 व्या षटकात पंतच्या भात्यातून कोणीही विचार करणार नाही, अशी घटना घडल्याचे पाहायला मिळाले.

सनरायझर्स हैदराबादच्या विजय शंकरने प्रमाणापेक्षा बाहेर नो बॉल टाकल्याचे पाहायला मिळाले. 13 व्या षटकात विजय शंकरने टाकलेला चेंडू पंतने अक्षरश: वडून आणि तावातावाने मारताना दिसले. पंचांनी अपेक्षेप्रमाणे हा चेंडू नो बॉल दिला. विजय शंकरने आपल्या तीन षटकात 19 धावा खर्च केल्या. त्याने धावावंर अंकूश ठेवला असला तरी त्याला एकही गडी बाद करता आला नाही. हैदराबादकडून सिद्धार्थ कौलने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. तर राशीद खानला एक यश मिळाले.