esakal | IPL 2021: पहिली फिफ्टी लेकीसाठी; 'विराट' सेलिब्रेशन पाहिले का? (VIDEO)

बोलून बातमी शोधा

Virat Kohli
IPL 2021: पहिली फिफ्टी लेकीसाठी; 'विराट' सेलिब्रेशन पाहिले का? (VIDEO)
sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

आयपीएल 2021 (IPL 2021) च्या हंगामात विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (RCB) धमाकेदार सुरुवात केली आहे. स्पर्धेतील पहिल्या चार सामन्यातील विजयासह संघ गुणतालिकेत टॉपला आहे. एबी-मॅक्सवेलच्या दमदार कामगिरीनंतर आता विराट कोहली देखील लयीत आला आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने स्पर्धेतील पहिले अर्धशतक झळकावले. त्याची नाबाद अर्धशतकी खेळी आणि देवदत्त पडिक्कलने केलेल्या शतकाच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्सने 178 लक्ष्य 17 व्या षटकात पार केले. युवा सलामीवीर देवदत्त पडिक्कलने (नाबाद 101) आणि कर्णधार विराट कोहली (नाबाद 72) धावा केल्या. विराट कोहलीने यंदाच्या हंगामातील पहिली फिफ्टी आपली मुलगी वामिका (Vamika) ला समर्पित केली.

हेही वाचा: IPL 2021: विराट म्हणाला, स्ट्राईक देतो आधी सेंच्युरी कर! Video

आयपीएलच्या अधिकृत इन्टाग्राम अकाउंटवरुन विराट कोहलीचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. यात तो फिफ्टी केल्यानंतर डग आउट आणि स्टेडियममध्ये उपस्थितीत आरसीबीच्या चाहत्यांकडे पाहून बॅट उंचावताना पाहायला मिळते. कोहलीने आपली पहिली फिफ्टी लेकीसाठी डेडिकेट केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्पर्धा बायोबबलमध्ये होत असली तरी आरसीबी संघ व्यवस्थापनाने खेळाडूंना फॅमिलीला सोबत आणण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळेच अनुष्का शर्मा आणि त्याची मुलगी वामिका प्रत्येक सामन्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थितीत असल्याचे दिसते. मागील वर्षी युएईत रंगलेल्या स्पर्धेतही अनुष्का विराटसोबतच होती.

RCB गुणतालिकेत पहिल्या स्थानावर

यंदाच्या हंगामात विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाने सलग चार विजय नोंदवले आहेत. 8 गुणांसह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. आतापर्यंत झालेल्या आयपीएलमधील सामन्यात आरसीबीने एकही सामना गमावलेला नाही. पहिल्या चार सामन्यात एकही पराभव न होणारी आरसीबी ही एकमेव टीम आहे. पहिल्या सामन्यात त्यांनी मुंबई इंडियन्सच्या संघाला पराभूत केले होते. सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांचाही त्यांनी पराभव केलाय. चौथ्या सामन्यात बंगळुरुच्या संघासमोर 178 धावांचे आव्हान होते. हे आव्हान विराट आणि देवदत्त या ओपनिंग पेयरनेच पार केले.