esakal | IPL 2021: स्पर्धा थांबवावीच लागणार; MI vs SRH शेवटची लढत?

बोलून बातमी शोधा

MI vs SRH
IPL 2021: स्पर्धा थांबवावीच लागणार; MI vs SRH शेवटची लढत?
sakal_logo
By
टीम ई सकाळ

IPL 2021 Postponed After MI vs SRH Match : आयपीएलच्या 14 व्या हंगामातील मुंबई इंडियन्स (MI) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यातील सामन्यानंतर स्पर्धा स्थगित होण्याचे संकेत आहेत. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) खेळाडू आणि स्टाफ मेंबर्सचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर स्पर्धेवर संकटाचे ढग निर्माण झाले होते. बीसीसीआय (BCCI) उर्वरित सर्व सामने मुंबईतील मैदानात खेळवण्यासाठी चाचपणी सुरु केल्याचे वृत्तही समोर आले. मात्र परदेशी खेळाडू सध्याच्या परिस्थितीत खेळण्यास तयार नाहीत. बांगलादेशच्या खेळाडूंनी कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत यंदाच्या हंगामात खेळण्यास असमर्थता दर्शवल्याची माहिती समोर येत आहे. बीसीसीआयने यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

हेही वाचा: IPL मुंबईत शिफ्ट करण्याचा विचार; BCCI समोर बायो-बबलचे आव्हान

अमहदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्सचे सामने नियोजित होते. वरुण चक्रवर्ती आणि संदीप वारियर यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर एकच खळबळ माजली होती. कोलकाताचा संपूर्ण संघ क्वारंटाईन करण्यात आला असून सात दिवस संघाचे सामने होणार नाहीत, असे बीसीसीआयकडून स्पष्ट करण्यात आले होते. एवढेच नाही तर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळलेल्या दिल्ली कॅपिटल्सच्या संघालाही क्वांरटाईनच्या सुचना दिल्या होत्या. दुसरीकडे दिल्लीच्या मैदानात होत असलेल्या चेन्नई सुपर किंग्जच्या सामन्यासंदर्भातही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. चेन्नई सुपर किंग्जचे बॉलिंग कोच एल बालाजी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने चेन्नईच्या संघालाही क्वारंटाईनच्या प्रक्रियेतून जावे लागणार आहे. त्यामुळे बुधवारी नियोजित असलेला चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि राजस्थान रॉयल्स (RR) सामनाही पुढे ढकलण्यात आला आहे.

हेही वाचा: IPL 2021 : स्पर्धा संकटात; बायोबबलमध्ये कोरोना आला कसा?

दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात मंगळवारी होणाऱ्या सामन्यानंतर स्पर्धा स्थगित करण्याची नामुष्की आयोजकांवर ओढावली आहे. बीसीसीआय स्पर्धा कोणत्याही परिस्थितीत पार पाडण्याच्या भूमिकेवर ठाम असले तरी सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीत त्यांच्यासमोर स्पर्धा स्थगित केल्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही. खेळाडूंमध्ये निर्माण झालेले भीतीच्या वातावरणामुळे आयोजकांचे टेन्शन आणखी वाढले आहे. याशिवाय उर्वरित सामने मुंबईला हलवण्याची तयारी सुरु असताना कोरोना संकटात मुंबईमध्ये सामने खेळवण्यास परवानगी देऊ नये, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलीये. त्यामुळे स्पर्धा स्थगित होते जवळपास अटळ आहे.