esakal | IPL 2021, MI vs SRH Live : रोहितनं टॉस जिंकला; प्रवाहाच्या विरुद्ध निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

Bumrah and bolt

IPL 2021, MI vs SRH : मुंबईचा पुन्हा दिमाखदार विजय!

sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

IPL 2021, Mumbai vs Hyderabad, 9th Match : बेयरस्टो आणि डेविड वॉर्नर परतल्यानंतर मुंबई इंडियन्सने सामना आपल्या बाजूने वळवत स्पर्धेतील दुसरा विजय नोंदवला. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) चा कर्णधार रोहित शर्माने सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad ) विरुद्धच्या सामन्यात टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. क्विंटन डिकॉक 40 आणि रोहित शर्माच्या 32 धावा करुन संघाला चांगली सुरुवात करुन दिली. पोलार्डने अखेरच्या षटकात 22 चेंडूत 35 धावा करत मुंबईच्या धावफलकावर 150 धावा लावल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना चांगल्या सुरुवातीनंतर सनरायझर्स हैदराबादचा संघ 137 धावांत आटोपला.

IPL 2021, MIvsSRH Match Highlights : MI म्हणजे 'डेथ ओव्हर्सचा डेंजर झोन' (VIDEO)

कर्णधार डेविड वॉर्नर (David Warner) आणि जॉनी बेयरस्टोने (Jonny Bairstow) संघाला दमदार सुरुवात करुन दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 67 धावा केल्या. सेट झालेली ही जोडी कृणाल पांड्याने (Krunal Pandya) फोडली. मनिष पांड्ये पुन्हा एकदा अपयशी ठरला. हार्दिक पांड्याने वॉर्नरला रन आउट करत मुंबईला सामन्यात आणले. राहुल चाहरने अभिषेक शर्माला स्वस्तात माघारी धाडले. बुमराहने अष्टपैलू विजय शंकरला माघारी धाडत सनरायझर्स हैदराबादला बॅकफूटवर टाकले. उरली सुरली कसर डेथ ओव्हर्स स्पेशलिस्ट बुमराह आणि ट्रेंट बोल्टने पूर्ण केली. मुंबई इंडियन्सकडून राहुल चाहर आणि बोल्टने 3-3 विकेट घेतल्या.

IPL 2021, SRH vs MI : IPL 2021 : सुर्या-रोहितसमोर विजय शंकर जिंकला! (VIDEO)

#137-10 : खालिदला बोल्ड करत बोल्टने मुंबईच्या विजयावर केलं शिक्कामोर्तब

#135-9 : भुवी अवघी एक धाव करुन झाला बोल्टचा शिकार

#134-8 : बुमराहच्या गळाला लागला मोठा मासा, विजय शंकर 28 धावा करुन परतला

#130-7 : बोल्टनं राशीद खानला खातेही उघडू दिले नाही

#129-6 : हार्दिक पांड्याने अब्दुल समदच्या रुपात दुसऱ्या गड्याला केलं रन आउट

#104-5 : राहुल चाहरने अभिषेक शर्माला 2 धावांवर केले बाद

#102-4 : विराट सिंग 11 धावा करुन माघारी, राहुल चाहरला मिळाली विकेट

90-3 : हार्दिक पांड्याने 36 धावांवर खेळणाऱ्या वॉर्नरला अप्रतिम थ्रोवर रन आउट केलं

71-2 : राहुल चाहरने मनिष पांड्येला 2 धावांवर धाडले माघारी

67-1 : जॉनी बेयरस्टो 22 चेंडूत 43 धावांची खेळी करुन परतला, कृणाल पांड्याला मिळाले यश

सनरायझर्स हैदराबादचा बदलाचा प्रयोग यशस्वी; सलामी जोडीने 29 चेंडूत कुटल्या 50 धावा

कर्णधार डेविड वॉर्नर आणि बेयरस्टोने जोडीनं केली सनरायझर्स हैदराबादच्या डावाला सुरुवात

David Warner And Jonny Bairstow

David Warner And Jonny Bairstow

अखेरच्या षटकात पोलार्डची फटकेबाजी; निर्धारित 20 षटकात मुंबईने 5 गड्यांच्या मोबदल्यात केल्या 150 धावा

131-5 : विराट सिंगनं घेतला हार्दिक पांड्याचा कॅच, खलिदला मिळाले यश

114-4 : मुजीबने घेतली ईशान किशनची विकेट, त्याने 12 धावांची भर घातली

#98-3 : मुजीबने क्विंटन डिकॉकला धाडले माघारी, सलामीवीराने 40 धावांची भर घातली

#71-2 : विजय शंकरने संघाला मिळवून दिले दुसरे यश; सूर्यकुमार एक चौकार एक चौकार खेचून तंबूत परतला

SRH VS MI

SRH VS MI

#55-1 : रोहित शर्माच्या 32 (25) रुपात मुंबई इंडियन्सला पहिला धक्का, विजय शंकरला मिळाले यश

#क्विंटन डिकॉक आणि रोहित शर्मा यांच्यात अर्धशतकी भागीदारी

Mumbai Indians

Mumbai Indians

#हैदराबादच्या संघात चार बदल, मुजीब उर रेहमान, खलील अहमद, अभिषेक शर्मा, विराट सिंगला संधी

#मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून घेतला बॅटिंग करण्याचा निर्णय