IPL 2022 back up plan update | बीसीसीआयचा IPL 2022 बाबत काय आहे बॅकअप प्लॅन? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IPL 2022 back up plan update bcci and ipl franchise meeting

बीसीसीआयचा IPL 2022 बाबत काय आहे बॅकअप प्लॅन?

IPL 2022 : भारतात कोरोनाची वाढती रूग्णसंख्या पाहता बीसीसीआय आयपीएलच्या आयोजनाबाबत विचारमंथन करत आहे. आज बीसीसीआय आणि आयपीएल संघांमध्ये बैठक झाली असून, हा कार्यक्रम भारतातच आयोजित करण्याबाबत विचार केला जात आहे. इंडियन प्रीमियर लीग 2022 चा हंगाम जवळ येत आहे. यावेळी आयपीएल भारतात होणार आहे. मात्र कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येने बीसीसीआयला विचार करायला भाग पाडले आहे. शनिवारी बीसीसीआय आणि आयपीएलच्या संघांमध्ये नवीन हंगामाबाबत चर्चा होणार आहे.(IPL 2022 back up plan update)

हेही वाचा: IPL Auction 2022 : रिटेन्शनवर कोणी केली दौलतजादा, कोणी वाचवले पैसे?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयला आशा आहे की आयपीएलचे आयोजन भारतातच केले जाईल. यासाठी खेळाडूंना जास्त प्रवास करावा लागू नये यासाठी मुंबई आणि जवळच्या शहरांकडे पर्याय म्हणून पाहिले जात आहे. याशिवाय आयपीएल सुरू होण्याची तारीख 27 मार्च असू शकते. कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही. अशा परिस्थितीत खेळाडूंना बायो-बबलमध्ये राहावे लागेल. अशा परिस्थितीत बीसीसीआय प्रयत्न करत आहे की जर आयपीएलचे आयोजन भारतात झाले पाहिजे.

काय आहे बीसीसीआयचा बॅकअप प्लॅन

कोरोनाचा विचार करून बॅकअप प्लॅनचाही विचार सुरू आहे. आयपीएल भारताबाहेर गेले तर दक्षिण आफ्रिका किंवा यूएई हाच पर्याय असू शकतो.

हेही वाचा: IPL 2022 मधून 'या' ५ दिग्गजांनी का घेतली माघार?

मेगा लिलावाची तारीख जवळ येत आहे

कोरोनामुळे IPL 2021 चा अर्धा हंगाम देखील UAE मध्ये आयोजित करण्यात आला होता. भारतात आयपीएल सुरू असताना आयपीएलच्या बायोबबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यामुळे स्पर्धा अर्ध्यावर स्थगित करावी लागली होती. अशा परिस्थितीत यंदा आयपीएल भारतात होणार आहे. प्रेक्षकांच्या उपस्थितीत आयपीएल होईल अशी आशा होती. मात्र भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सध्या तरी आयपीएलचा १५ वा हंगाम प्रेक्षकांविनाच होणार आहे.

Web Title: Ipl 2022 Back Up Plan Update Bcci And Ipl Franchise Meeting

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :IPLBCCIIPL 2022