IPL 2022 : CSK ची जय-वीरूची जोडी तुटणार तर धोनी खेळणार तीन हंगाम? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MS Dhoni

CSK ची जय-वीरूची जोडी तुटणार तर धोनी खेळणार तीन हंगाम?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : येत्या काही महिन्यातच आयपीएल २०२२ ला (IPL 2022) सुरुवात होणार आहे. यासाठी पुढील महिन्यात लिलावाची प्रक्रिया पार पडणार असल्याचे समजते. यासाठी कोणाला संघात कायम ठेवायचे आणि कोणाला बाहेर यासाठी सर्वच संघ मालकांकडून माथापच्ची सुरू झालेली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये दोन नवीन संघ खेळणार असल्याने मोठ्या प्रमाणात बदल पाहायला मिळणार आहे. आनंदाची बातमी म्हणजे थाला म्हणजे महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) चेन्नईकडून (Chennai Super Kings) खेळताना दिसणार आहे.

एका वृत्तपत्राच्या बातमीनुसार, बीसीसीआयच्या नियमानुसार प्रत्येक संघाला जास्तीत जास्त चार खेळाडूंना ठेवण्याची परवानगी आहे. फ्रेंचायझींना कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी ३० नोव्हेंबरपर्यंत सादर करायची आहे. कारण, आयपीएलचा मेगा लिलाव (IPL Mega Auction) पुढील महिन्यात होणार आहे. अशात सीएसकेने धोनीला कायम ठेवले तर आश्चर्य वाटायला नको. नुकत्याच झालेल्या सीएसकेच्या कार्यक्रमात धोनीने त्याचा शेवटचा टी-२० सामना चेन्नईमध्ये होईल, असे म्हटले होते.

हेही वाचा: ...अन् मध्यरात्री आईला मुलगी प्रियकरासोबत दिसली नको त्या अवस्थेत

प्राप्त वृत्तावर विश्वास ठेवला तर भारताचा माजी कर्णधार आणि सध्याचा आयपीएल चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी केवळ आयपीएल २०२२ साठी पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही तर पुढील तीन हंगामात देखील खेळताना दिसणार आहे. दुसरीकडे सुरेश रैनाबद्दल चांगली बातमी नाही. सुरुवातीपासून जय-वीरूप्रमाणे सीएसकेचा भाग असलेली धोनी आणि रैना ही जोडी तुटू शकते. चेन्नई सुपर किंग्स आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावापूर्वी एमएस धोनीला पुढील तीन हंगामांसाठी कायम ठेवू शकते.

फ्रेंचायझी सुरेश रैनाला (Suresh Raina) कायम ठेवणार नसल्याचे समजते. सीएसके सुरेश रैनाला पहिल्यांदाच संघात ठेवणार नाही. आयपीएल २०२१ च्या बाद फेरीतही त्याला संघात स्थान दिले नव्हते. धोनी व्यतिरिक्त फ्रेंचायझी अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि सलामीवीर रुतुराज गायकवाड यांना कायम ठेवू शकतात. यांनी २०२१च्या विजेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावली होती. सीएसके इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीलाही कायम ठेवू शकते.

हेही वाचा: हॉट अभिनेत्री मीरा जगन्नाथचे पोझ बघितले का?

पुढचा हंगाम भारतात

बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले, आयपीएलचा पुढचा हंगाम भारतात खेळवला जाईल. अशा परिस्थितीत अली चेन्नईच्या संथ आणि टर्निंग विकेटवर यशस्वी खेळाडू ठरू शकतो, असे सीएसकेला वाटते. अलीने राहण्यास सहमती न दिल्यास, सीएसकेकडे डावखुरा मध्यमगती गोलंदाज सॅम करन हा त्यांचा चौथा कायम ठेवणारा खेळाडू असेल.

loading image
go to top