वॉर्नरच्या ऑफरला चहलचा रिप्लाय, दोघांत धनश्रीची एन्ट्री होईल?

Yuzvendra Chahal, Dhanashree Verma And David Warner
Yuzvendra Chahal, Dhanashree Verma And David WarnerSakal
Updated on

ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वार्नर (David Warner) इन्स्टाग्राम चांगलाच सक्रीय असतो. त्याने नुकतीच या माध्यमातून एक पोस्ट शेअर केलीये. त्याने चक्क युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) सोबत डुएट रील बनवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. वॉर्नरसह युजवेंद्र चहल सोशल मीडियावर सर्वाधिक सक्रीय असणारे क्रिकेट आहेत.

दोघेही सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून चाहत्यांचे मनोरंजन करत असतात. वार्नरनं सोशल मीडियाच्या माध्यमातून चहलच्या फोटोसह एक मीम शेअर केले आहे. 'आयसीसी पुरुष टिकटॉकर ऑफ डिकेड।' अस कॅप्शन त्याने शेअर केलल्या फोटोला दिले आहे. युजवेंद्र चहलसह मला इन्स्टा रीलवर पाहायला आवडेल का? असा प्रश्नही वॉर्नरने चाहत्यांना दिला आहे. युजवेंद्र चहलने त्याच्या या पोस्टवर 'ओ माय गॉड' असा रिप्लायही दिला आहे.

Yuzvendra Chahal, Dhanashree Verma And David Warner
U19 World Cup: युवा संघाला माजी कर्णधाराकडून 'विराट' टिप्स

डेविड वॉर्नर दाक्षिणात्य चित्रपटातील गाण्याचा मोठा फॅन आहे. मागील काही दिवसांपासून तो अल्लू अर्जुनच्या लोकप्रिया पुष्पा चित्रपटातील गाण्यासह डायॉलगवर काही खास व्हिडिओ शेअर करताना दिसले आहे. दुसरीकडे चहलही सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना भेटत असल्याचे पाहायला मिळाले आहे. वार्नर आणि चहल आयपीएल 2022 च्या मेगा लिवावात विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. परदेशी खेळाडूमध्ये वॉर्नरला मोठी रक्कम मिळण्याची शक्यता आहे. 12 आणि 13 फेब्रुवारीला बंगळुरुमध्ये होणाऱ्या लिलावात या दोघांवर कोणता संघ बोली लावणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Yuzvendra Chahal, Dhanashree Verma And David Warner
अबतक 999! विक्रमी सामन्यापूर्वी टीम इंडियाला सचिनचा खास मेसेज

आयपीएलच्या आगामी हंगामात एकत्र खेळताना या दोघांची इन्स्टावरही एक्शन दिसली तर नवल वाटणार नाही. याशिवाय या दोघात धनश्री वर्माची एन्ट्रीही होऊ शकतो. युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मामुळेच युजवेंद्र चहल सोशल मीडियावर सक्रीय झाला आहे. धनश्री वर्माही कोरिओग्राफर आहे. शिखर धवन आणि श्रेयस अय्यर या भारतीय खेळाडूंना ती डान्स स्टेप शिकवताना दिसली आहे. चहल आणि वॉर्नर एकत्र आले तर यात तिची एन्ट्रीही आगामी काळात दिसू शकते. जर ही गोष्ट घडली तर तिघांच्या चाहत्यांना ती नक्की आवडेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com