...म्हणून इंग्लंडच्या हिरोनं नाकारला IPL चा प्रस्ताव

ipl 2022 joe root
ipl 2022 joe rootSakal

IPL 2022 : इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूटने (Joe Root )आयपीएलमध्ये (IPL 2022) खेळण्याचा विचार बाजूला सोडून कसोटीवर फोकस करण्याचा निर्णय घेतला आहे. आयपीएलच्या आगामी हंगामासाठी मेगा लिलाव (IPL Auction 2022) पार पडणार आहे. या लिलावासाठी अनेक नावे चर्चेत असताना जो रुटने मात्र आयपीएलपासून दूर राहण्याचा निर्णय घेतलाय. रूटने 2018 मध्ये आयपीएल लिलावात भाग घेतला होता. पण त्याला कोणत्याही संघाने भाव दिला नाही.

याआधी आयपीएलच्या मेगा लिलावात (IPL Auction 2022) सहभागी होण्याचा विचार करत असल्याचे त्याने म्हटले होते. यावेळी त्याने एक गोष्ट स्पष्ट केली होती. आयपीएलमध्ये खेळल्यामुळे जर कसोटी क्रिकेटवर (Test Cricket) काही परिणाम होणार नसेल तर या स्पर्धेत सहभागी होण्यास माझी काही हरकत नाही. ऑस्ट्रेलियाच्या मैदानात पार पडलेल्या अ‍ॅशेस मालिकेत इंग्लंडच्या संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. 5 सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडला 4-0 अशा पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवानंतर जो रुटचं मन बदललं आहे.

ipl 2022 joe root
'IPLच्या पॉवर सेंटर्सची निर्णयामध्ये ढवळाढवळ होऊ नये'

अ‍ॅशेस मालिकेनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत रुट म्हणाला की, 'सध्याच्या घडीला इंग्लंडच्या कसोटी संघात खूप सुधारणा करण्याचे चॅलेंज आहे. यासाठी संपूर्ण ऊर्जा मला कसोटीसाठी खर्च करावी लागेल. माझ्यासाठी कसोटी हेच सर्वकाही आहे. त्यासाठी मी बाकीच्या गोष्टींचा त्याग करायला तयार आहे. यावेळी जो रुटनं आयपीएलचा प्रस्ताव नाकारला असल्याच्या वृत्ताचीही पुष्टी केलीये. आयपीएलच्या यंदाच्या हंगामासाठी नव्याने संघ बांधणी होणार आहे. 10 संघाच्या रणसंग्रामासाठी 12 आणि 13 फेब्रुवारीला बंगळुरुमध्ये मेगा लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे.

ipl 2022 joe root
Australian Open 2022 : कोर्टवरील मनमोहक क्षण

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात विद्यमान 8 संघ आणि अहमदाबाद आणि लखनऊ हे दोन नवे संघ मैदानात उतरणार आहेत. आयपीएलच्या मेगा लिलावापूर्वी विद्यमान 8 संघांची खेळाडू रिटेन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दोन नव्या संघांना तीन खेळाडूंची निवड करता येणार आहे. त्यानंतर मेगा लिलावाच्या माध्यमातून प्रत्येक संघ नव्यानं संघ बांधणी करेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com