'IPLच्या पॉवर सेंटर्सची निर्णयामध्ये ढवळाढवळ होऊ नये' | Sanjay Jagdale says BCCI should ensure that the IPL power centers do not interfere | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Jagdale says BCCI should ensure IPL power centers not interfere
'IPLच्या पॉवर सेंटर्सची निर्णयामध्ये ढवळाढवळ होऊ नये'

'IPLच्या पॉवर सेंटर्सची निर्णयामध्ये ढवळाढवळ होऊ नये'

इंदूर : विराट कोहलीने (Virat Kohli) कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता नवा कसोटी कर्णधार (Test Captain) कोण होणार याची चर्चा जोरात सुरु आहे. अनेक जण तर्क वितर्क लढवत आहे. दरम्यान, बीसीसीआयचे (BCCI) माजी सचिव संजय जगदाळे (Sanjay Jagdale) यांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की विराट कोहलीनंतर कसोटी संघाचा पुढचा होणारा कर्णधार हा असा असावा जो ही भुमिका बराच काळ निभावू शकले. याचबरोबर जगदाळे यांनी आयपीएलच्या पॉवर सेंटर्सबाबत (IPL Power Centers) बीसीसीआय आणि निवडसमितीला एक इशाराही दिला. (Sanjay Jagdale says BCCI should ensure IPL power centers not interfere)

हेही वाचा: श्रेयस अय्यर विराट कोहलीची जागा घेणार?

विराट कोहलीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील शेवटचा कसोटी सामना संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी कसोटी कर्णधारपद सोडत असल्याची घोषणा केली. त्याच्या कर्णधारपदाच्या कार्यकाळात भारताने ६८ पैकी ४० कसोटी सामने जिंकले. त्याने २०१४ मध्ये महेंद्रसिंह धोनीकडून (MS Dhoni) कसोटी नेतृत्वाची धुरा आपल्या हातात घेतली होती. आता बीसीसीआयला कसोटीसाठी नवे नेतृत्व शोधावे लागणार आहे.

दरम्यान, बीसीसीआयचे माजी सचिव संजय जगदाळे यांनी याबाबत आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले 'मला वाटते की भारताचा पुढचा कर्णधार हा ही जबाबदारी दीर्घ काळ सांभाळू शकले असा असावा. त्यामुळे माझ्या मते मी केएल राहुलचे (KL Rahul) पुढचा कसोटी कर्णधार म्हणून नाव सुचवतो.'

हेही वाचा: Australian Open: राफेल नदालने एक पाऊल टाकले पुढे

जगदाळे यांना वाटते की राहुलने तीनही क्रिकेट प्रकारात चांगली कामगिरी करुन दाखवली आहे. याचबरोबर जगदाळे यांनी बीसीसीआय आणि निवडसमितीने भारतीय क्रिकेटच्या (Indian Cricket) रणनीती ठरवण्याच्या निर्णयात आयपीएलचे पॉवर सेंटर्स ढवळाढवळ करणार नाहीत याची काळजी घेण्यावरही भर दिला.

गेल्या काही महिन्यांपासून विराट कोहली आणि बीसीसीआयमध्ये तणावाचे वातावरण होते. बीसीसीआयने त्याला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरुन हटवले होते. मात्र जगदाळे या बाबत म्हणाले की, विराट कोहलीने आपल्या कार्यकाळात भारतीय क्रिकेट संघाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले.कोणीही कसोटी क्रिकेटमधील विराट कोहलीचे योगदान नाकारु शकत नाही.

Web Title: Former Bcci Secretary Sanjay Jagdale Says Bcci Should Ensure That The Ipl Power Centers Do Not Interfere

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top