
IPLवर दहशतवादाचं सावट नाही; मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण
मुंबई: येत्या 26 मार्चपासून आयपीएलचा 15 वा हंगाम सुरू होणार आहे. महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या शहरातही आयपीएलचे सामने होणार आहेत. या सिझनला दहशतवाद्यांचा धोका असल्याची माहिती मिळाली होती. दहशतवादी विरोधी पथकाने ही माहिती दिली होती, अशी माहिती समोर आली होती. आयपीएल खेळवण्यात येणारी ठिकाणे आणि खेळाडूंची हॉटेल्स ही दहशतवाद्यांच्या रडावर असल्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र, आता मुंबई पोलिसांनी याबाबत स्पष्टोक्ती दिली आहे. त्यांनी आता स्पष्ट केलंय की, आयपीएल 2022 च्या हंगामाला कोणत्याही प्रकारचा धोका असल्याची माहिती नाहीये. तसेच आयपीएलमधील खेळाडू आणि आयपीएल सामन्यांना सर्वोतोपरी सुरक्षा प्रदान करण्याच्या दृष्टीने सर्व आवश्यक व्यवस्था करण्यात आल्या असल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय.
हेही वाचा: आयपीएलवर दहशतवादाचे सावट; एटीएसने दिला इशारा
मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांनीही ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, आयपीएलला दहशतवाद्यांचा धोका असल्याची माहिती निराधार आहे. अशा प्रकारच्या कोणत्याही माहितीवर विसंबून राहू नका, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
हेही वाचा: रशियाविरोधात जगभर निषेध व्यक्त करण्याचं झेलेन्स्कींचं आवाहन
एटीएसने काही दिवसांपूर्वी एका दहशतवाद्याला अटक केली होती. या दहशतवाद्याने आयपीएलचे सामने होणाऱ्या ठिकाणांची आणि खेळाडू राहणार असलेल्या हॉटेल्स बाहेरची रेकी केली होती. मुंबई पोलिसांच्या अंतर्गत सर्क्युलरमध्ये एटीएसने अटक केलेल्या दहशतवाद्याने वानखेडे स्टेडियम, ट्रायडंट हॉटेल आणि नरिमन पाईंट या मार्गावर रेकी केली होती. या अहवालाची कॉपी द फ्री प्रेस जर्नलच्या हाती लागली होती. एटीएसच्या चौकशीत आयपीएलवर दहशतवादाचे सावट असल्याचे उघड झाल्यानंतर स्टेडियम आणि खेळाडूंची हॉटेल्सची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
Web Title: Ipl 2022 Mumbai Police Sanjay Pandey No Input About Any Threat For Ipl
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..