रशियाविरोधात जगभर निषेध व्यक्त करण्याचं झेलेन्स्कींचं आवाहन

Volodymyr Zelenskyy
Volodymyr Zelenskyy

रशियाने युक्रेनविरोधात पुकारलेल्या युद्धाला आज बरोबर एक महिना पूर्ण झाला आहे. मागच्या महिन्यात याच तारखेला रशियाने युक्रेनविरोधात (Ukraine) हल्लाबोल केला होता. 24 फेब्रुवारीच्या रात्री दोन वाजल्यापूसन ते 22 मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत आतापर्यंत 977 सामान्य नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकृत आहे. संयुक्त राष्ट्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या काळात 1594 लोक जबर जखमी झाले आहेत. मात्र, हा आकडा याहून कितीतरी पटीने अधिक असू शकतो, असं संयुक्त राष्ट्रांच्या एजन्सीने म्हटलंय. (Russia Invasion)

"रशियाचं युक्रेनवरील आक्रमण म्हणजे सगळीकडच्याच स्वातंत्र्यावरील आक्रमण"

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी आता संपूर्ण जगालाच रशियाच्या या आक्रमणाविरोधात उभं राहण्याचं आवाहन केलं आहे. जागतिक स्तरावर या आक्रमणाचा निषेध व्हावा, असं आवाहन झेलेन्स्की यांनी केलं आहे. काल बुधवारी उशीरा रात्री प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडीओमध्ये झेलेन्स्की यांनी म्हटलंय की, रशियाचं युक्रेनविरोधातील आक्रमण म्हणजे सगळीकडच्याच स्वातंत्र्यावरील आक्रमण असल्याचंही झेलेन्स्की यांनी म्हटलंय.

या व्हिडीओमध्ये झेलेन्स्की यांनी म्हटलंय की, आजपासून आणि त्यानंतरही, तुमची ठाम भूमिका व्यक्त करा. तुमच्या कार्यालयातून, तुमच्या घरातून, तुमच्या शाळा आणि विद्यापीठांमधून बाहेर या. शांततेसाठी बाहेर पडा. युक्रेनचे समर्थन करण्यासाठी, स्वातंत्र्याचे समर्थन करण्यासाठी, शांत जीवनाचे समर्थन करण्यासाठी युक्रेनियन सिम्बॉलसहित बाहेर या. आपल्या शाळेच्या मैदानात, आपल्या रस्त्यावर या... म्हणा की लोक महत्त्वाचे आहेत, त्यांचं स्वातंत्र्य महत्त्वाचे आहे, शांतता महत्त्वाची आहे, युक्रेन महत्त्वाचे आहे, असं भावनिक आवाहनही त्यांनी केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com