
नव्या नियमांनुसार संघांच्या प्लेइंग इलेव्हनपासून डीआरएसपर्यंत काही बदल करण्यात आलेत.
मुंबई - अवघ्या काही दिवसांत आयपीएल २०२२ चा (IPL 2022) हंगाम सुरु होणार आहे. दरम्यान त्याआधी बीसीसीआयने (BCCI) काही नियमात बदल केले आहेत. नव्या नियमांनुसार संघांच्या प्लेइंग इलेव्हनपासून डीआरएसपर्यंत काही बदल करण्यात आलेत. बीसीसीआयने आयपीएलच्या १५ व्या हंगामासाठी सोमवारी नवे नियम जारी केलेत. यात सर्वात महत्त्वाचा म्हणजे संघात एखादा कोरोना (Coronavirus) रुग्ण आढळल्यास टीमच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करता येणार आहे. (IPL 2022 new rule drs playing xi)
कोरोनामुळे संघाला प्लेइंग इलेव्हन तयार करण्यात अडचण आल्यास त्यांचा सामना पुन्हा शेड्युल केला जाणार आहे. तसंच पुन्हा देखील सामना होऊ शकला नाही तर याबाबत तांत्रिक समितीकडे हे प्रकरण पाठवण्यात येईल. याशिवाय प्रत्येक डावात दोन डीआरएस असणार आहेत. आयपीएल २०२२ च्या पहिल्या सामन्यात गतविजेते चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यात होणार आहे.
बीसीसीआयच्या हवाल्याने क्रिकबझने वृत्त दिलं असून त्यात म्हटलं आहे की, बोर्ड त्यांच्या विचाराने सामना पुन्हा खेळवण्याचा प्रयत्न करेल. जर असं झालं नाही तर या प्रकरणी आयपीएलच्या तांत्रिक समितीला हे पाठवलं जाईल. आयपीएलच्या तांत्रिक समितीचा निर्णय अंतिम राहणार आहे. आधीच्या नियमाप्रमाणेच हा नियम असून यात एक बदल करण्यात आला आहे. आधीच्या नियमात सामना रिशेड्युल करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला नाही तर ज्यांच्यामुळे सामना होऊ शकला नाही त्यांना पराभूत ठरवून प्रतिस्पर्धी संघाला दोन गुण देण्यात येतील.
डीआरएसच्या नियमातील बदलसुद्धा महत्त्वाचा ठरणार आहे. नव्या नियमानुसार, प्रत्येक डावात डीआरएसची संख्या एकवरून दोन करण्यात आली आहे. बीसीसीआयने एमसीसीने दिलेल्या सल्ल्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात असंही सांगण्यात आलं होतं की, नव्या फलंदाजाला स्ट्राइकला यावं लागेल. मग तो फलंदाज झेलबाद होताना क्रीजच्या मधोमध जरी असला तरी येणाऱ्या फलंदाजाला स्ट्राइकला खेळावं लागेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.