Pakistan VS Australia 2nd Test | पाकिस्तानी अंपायरला 'या' निर्णयासाठी नेटकऱ्यांनी काढले वेड्यात | Umpire Trolls | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PAK vs AUS 2nd test umpire ahsan raja trolls shocking decision

PAK vs AUS : पाकिस्तानी अंपायरला 'या' निर्णयासाठी नेटकऱ्यांनी काढले वेड्यात

PAK vs AUS : पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना कराची येथे खेळला जात आहे. या सामन्यात पाकिस्तानी अंपायर अहसान रझा खेळाडूंपेक्षा जास्त चर्चेत आहे. यामागचे कारण त्याचा ऑनफिल्ड निर्णय, ज्यामुळे चाहते त्याला सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी, पाकिस्तानच्या पहिल्या डावात हसान रझा यांच्याविरुद्ध एलबीडब्ल्यू अपील होते, अंपायरने ऑस्ट्रेलियाच्या बाजूने निर्णय देत आऊट सांगितले, याकडे सर्वांचे लक्ष वेधले. अहसान रझाचा LBW निर्णय हा कदाचित आतापर्यंतचा सर्वात धक्कादायक निर्णय होता कारण उघड्या डोळ्यांनी पाहताना चेंडू स्पष्टपणे ऑफ-स्टंपला चुकला होता.(Umpire Ahsan Raja Trolls Shocking Decision)

मोहम्मद रिझवानने डीआरएस घेण्यासाठी लगेच हातवर केला. रिप्लेमध्ये हे स्पष्टपणे दिसत होते की पॅट कमिन्सचा चेंडू ऑफ-स्टंपच्या खूप बाहेर खेळला गेला होता आणि चेंडूचा प्रभाव देखील खूप बाहेर होता, ज्यामुळे चेंडू कोणत्याही परिस्थितीत विकेटला आदळला नाही. अशा स्थितीत तिसऱ्या पंचाने रिझवानला नाबाद घोषित केले. मात्र, ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज रिझवानला त्रास देत राहिला. परिणामी, त्याच्या पुढच्या षटकात कमिन्सने ऑफ-स्टंपच्या बाहेर गोलंदाजी केली, ज्याचा बचाव करण्याचा रिझवानने प्रयत्न केला. पण चेंडू बॅटच्या बाहेरच्या काठाला लागला आणि ऑस्ट्रेलियन यष्टिरक्षक अॅलेक्स कॅरीच्या हातात गेला.

ऑस्ट्रेलियाने पहिला डाव नऊ विकेट्सवर 556 धावांवर घोषित केला. ऑस्ट्रेलियाकडून सलामीवीर उस्मान ख्वाजाने सर्वाधिक 160 धावांची खेळी खेळली. याशिवाय अॅलेक्स कॅरीने 93 आणि स्टीव्ह स्मिथने 72 धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संपूर्ण संघ 148 धावांवर गारद झाला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने तीन आणि मिचेल स्वेपसनने दोन बळी घेतले. पहिल्या डावाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला 408 धावांची मोठी आघाडी मिळाली. एवढी मोठी आघाडी असतानाही ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला फॉलोऑन न देण्याचा निर्णय घेतला.

Web Title: Pak Vs Aus 2nd Test Umpire Ahsan Raja Trolls Shocking Decision

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top