प्लॅन B नाहीये...! अनसोल्ड रैनाचा व्हिडिओ होतोय व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Suresh Raina

प्लॅन B नाहीये...! अनसोल्ड रैनाचा व्हिडिओ होतोय व्हायरल

भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू सुरेश रैना (Suresh Raina) वर आयपीएलच्या मेगा लिलावात 2022 (IPL Auction 2022) कुणीही बोली लावली नाही. आयपीएलच्या इतिहासात दमदार कामगिरीची नोंद असताना तो अनसोल्ड राहिला. मेगा लिलावात रैनाची मूळ किंमत 2 कोटी होती. आयपीएल मेगा लिलावापूर्वी प्रत्येक फ्रँचायझीला 4 खेळाडू रिटेन करण्याचा अधिका बहाल करण्यात आला होता. चेन्नई सुपर किंग्जने रैनावर भरवसा दाखवला नाही. पण चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) लिलावात रैनाला भाव देईल, अशी अपेक्षा होती. पण तसं झालं नाही. ‘मिस्टर आयपीएल’ (Mr. IPL) नावाने लोकप्रियता मिळवलेल्या गड्याला कुणीही आपल्या ताफ्यात घेतलं नाही.

आयपीएलच्या लिलावात ओढावलेल्या केविलवाण्या परिस्थितीनंतर सुरेश रैनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यात त्याने थेट बीसीसीआय आणि आयसीसीला विनंती केल्याचे पाहायला मिळते. या व्हिडिओमध्ये त्याने म्हटलंय की, जे खेळाडू बीसीसीआयशी करारबद्ध नाहीत आणि आयपीएलमध्येही त्यांना कोणी खरेदी केलेले नाही, अशा खेळाडूंना परदेशातील मैदानात खेळण्याची परवानगी द्यायला हवी.

हेही वाचा: 'मोठ्या खेळाडूंना मस्का लावलेलं आवडतं' व्यंकटेश प्रसादचे साहा प्रकरणावरून वक्तव्य

हेही वाचा: 'दिल्लीचा तो छोटा मुलगा' म्हणत युवराजने कोहलीला लिहिले भावनिक पत्र

या खेळाडूंकडे कोणताही बी प्लॅन नसतो. त्यामुळे बीसीसीआयने आयसीसी आणि फ्रँचायझीसोबत याविषयावर चर्चा करायला हवी. जो आंतरराष्ट्रीय मैदानापासून दूर आहे त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्येही भाव मिळत नाही, असा उल्लेखही त्याने आपल्या व्हिडिओ पोस्टमध्ये केला आहे. कॅरेबियन लीग आणि ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लिगमध्ये खेळून अनेक खेळाडू आपल्या राष्ट्रीय संघाकडून खेळले आहेत, असा दाखलाही त्याने दिला आहे.

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी फलंदाजाच्या यादीत डावखुऱ्या हाताने फलंदाजी करणाऱ्या सुरेश रैनाचा समावेश होतो. रैनाने आयपीएलमध्ये 205 सामन्यात 5528 धावा केल्या आहेत. यात त्याने 39 अर्धशतकासह एक शतकही झळकावले आहे. रैनाच्या खात्यात 203 षटकार आणि 506 चौकरांचा समावेश आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या रैनानं चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्वही केले आहे. पार्ट टाइम बॉलरची भूमिका निभावताना त्याने 25 विकेट्सही घेतल्या आहेत.

Web Title: Ipl 2022 Suresh Raina Emotional After Unsold Appeal To The Bcci Videos Goes Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :IPLIPL 2022