IPL 2023 Auction: इंग्लंडच्या लेगस्पिनरने IPL लिलावातून घेतली माघार! सांगितले धक्कादायक कारण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IPL Auction Rehan Ahmed

IPL 2023 Auction: इंग्लंडच्या लेगस्पिनरने IPL लिलावातून घेतली माघार! सांगितले धक्कादायक कारण

IPL Auction Rehan Ahmed : इंडियन प्रीमियर लीगचा मिनी लिलाव सुरू झाला आहे. कोचीमध्ये आज दुपारी अडीच वाजता लिलाव प्रक्रिया सुरू होणार आहे. क्रिकेटच्या सर्वात मोठ्या आणि श्रीमंत लीगमध्ये खेळण्यासाठी प्रत्येक देशाचे खेळाडू तयार आहेत. पण एक खेळाडू असा आहे ज्याने या लीगमध्ये खेळण्यास नकार दिला आहे. हा खेळाडू दुसरा कोणी नसून इंग्लंडचा युवा फिरकी गोलंदाज रेहान अहमद आहे.

हेही वाचा: IPL 2023 Auction: दोन परदेशी खेळाडूसाठी MI अन् CSK मध्ये जुंपणार ?

इंग्लंडकडून कसोटी सामना खेळणारा लेगस्पिनर रेहानने या महिन्यात 17 डिसेंबरला पाकिस्तानविरुद्धच्या कराची कसोटीत पदार्पण केले. त्याने पहिल्या डावात 2 तर दुसऱ्या डावात 5 बळी घेतले. पदार्पणाच्या सामन्यात 5 बळी घेणारा सर्वात तरुण खेळाडू होण्याचा विक्रमही रेहानच्या नावावर आहे.

हेही वाचा: IPL 2023 Auction: विराट कोहलीचा खास श्रीलंकन फिरकीपटूचा कहर! 11 चेंडूत ठोकल्या 50 धावा

या लेगस्पिनरने आयपीएल लिलावासाठी नोंदणी केली होती. रेहानलाही शॉर्टलिस्ट करण्यात आलं होतं. रेहानची मूळ किंमत 40 लाख रुपये होती. मात्र लिलावाच्या एक दिवस आधी त्याने आपले नाव मागे घेतले. त्यामागचे कारण म्हणजे त्याने कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्याचे सांगितले आहे. माझ्या काउंटी क्लबलाही वेळ द्यायचा आहे. रेहान अहमद सध्या कौंटी क्रिकेटमध्ये लीसेस्टरशायर संघाकडून खेळतो.

हेही वाचा: IPL Auction 2023: कोण होणार मालामाल! सर्वाधिक पसंती सॅम करन, बेन स्टोक्सला ?

कोचीमध्ये आयपीएल 2023 साठी मिनी लिलाव आयोजित करण्यात आला आहे. लिलावात 405 खेळाडू बोली लावणार आहेत. 10 संघांकडे जास्तीत जास्त 87 स्लॉट शिल्लक आहेत. यावेळी मिनी लिलावात 273 भारतीय आणि 132 विदेशी खेळाडू आहेत.