Mohit Sharma : पराभवानंतर रात्रभर झोप लागली नाही : मोहित शर्मा

अखेरच्या षटकात शेवटचे दोन चेंडू अजून चांगले कसे टाकता आले असते याचा विचार
ipl 2023 cricket Could not sleep all night after defeat Mohit Sharma
ipl 2023 cricket Could not sleep all night after defeat Mohit Sharma sakal

नवी दिल्ली : आपल्या दोन चेंडूंमुळे संघाचे विजेतेपद हरपले, असे समजून स्वतःला दोषी धरणारा गुजरात टायटन्स संघाचा मोहित शर्मा अजूनही त्या विचारांतून बाहेर आलेला नाही. रात्रभर मला झोप लागली नाही, अजून चांगले वेगळे काय करू शकलो असतो, हाच विचार सातत्याने मनात येत होता, अशी खंत मोहित शर्माने व्यक्त केली.

नरेंद्र मोदी स्टेडियमवर मध्यरात्रीपर्यंत रंगलेल्या गुजरात-चेन्नई यांच्यातील अंतिम सामन्यात चेन्नईला विजयासाठी अखेरच्या षटकांत १३ धावांची गरज होती. यातील पहिले चार चेंडूंवर हुकमी यॉर्कर मोहितने टाकले आणि केवळ तीनच धावा दिल्या,

पण पाचव्या चेंडूवर मोहितचा यॉर्कर चुकला आणि जडेजाने षटकार मारला. अखेरच्या चेंडूवर चार धावांची गरज असताना मोहितचा हा अखेरचा चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर फुलटॉस गेला. जडेजाने त्यावर चौकार मारून निर्णायक कलाटणी दिली.

ipl 2023 cricket Could not sleep all night after defeat Mohit Sharma
CSK IPL 2023 : आमच्या कार्यकर्त्यामुळे CSK ने आयपीएल जिंकले.... तमिळनाडू BJP अध्यक्षांचं अजब वक्तव्य

हे चेंडू कसे टाकायचे याबाबत माझे विचार स्पष्ट होते. अशी परिस्थिती आली तर कशी गोलंदाजी करायची, याचा सरावही मी नेटमध्ये केला होता. अशा परिस्थितीत मी या अगोदरही गोलंदाजी केलेली आहे. त्यामुळे या निर्णायक षटकात सहाही चेंडू यॉर्कर टाकायचे हे मी निश्चित केले होते, असे मोहितने सांगितले. पण जडेजा त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे ठरला आणि खाली वाकून स्टान्स घेत पाचव्या चेंडूवर षटकार मारून दडपण मोहितवर टाकले.

या षटकातील पहिले चार चेंडू अचूकपणे टाकल्यावर आणि पुढच्या दोन चेंडूंसाठी त्याचा आत्मविश्वास ठोस असतानाही कर्णधार हार्दिक पंड्या मोहितजवळ गेला आणि त्याच्याशी काही चर्चा केली, पण हार्दिकचा हा सल्ला पचनी पडला नाही आणि पाचव्या चेंडूवरचा टप्पा बदलला, तो अचूक यॉर्कर पडला नाही.

ipl 2023 cricket Could not sleep all night after defeat Mohit Sharma
MS Dhoni IPL 2023: 'झीरो फिर भी हीरो!' मोदीनंतर धोनीच ठरतोय लीडरशिपचा आदर्श!

सामन्यानंतर काही तज्ज्ञांनी हार्दिकच्या या कृतीवर टीका केली. पहिले चार चेंडू अपेक्षेनुसार टाकल्यानंतर हार्दिकला मोहितजवळ जाऊन त्याचे चित्त विचलित करण्याची गरज नव्हती, असे त्यांनी म्हटले आहे. मात्र मोहितने आपल्या कर्णधाराचे समर्थन केले. मी काय करणार आहे याची त्याला माहिती हवी होती. ती मी दिली, असे तो म्हणाला;

परंतु अखेरच्या दोन चेंडूंवर माझ्याकडे जे काही घडले त्याची खंत स्वस्थ बसू देत नव्हती. हे दोन चेंडू आणखी चांगल्या पद्धतीने कसे टाकता आले असते याचाच विचार सातत्याने येत होता. त्यामुळे रात्रभर झोप लागली नाही; परंतु आता हे विचार मागे टाकून पुढे जायला हवे, असेही मोहित म्हणाला. मोहितने यंदाच्या या मोसमात १४ सामन्यांत २७ विकेट मिळवल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com