IPL 2023 GT vs CSK : गतविजेत्या गुजरातची विजयी सुरूवात; चेन्नईची कडवी झुंज मोडून काढत जिंकला सामना

IPL 2023 GT vs CSK
IPL 2023 GT vs CSK esakal

IPL 2023 GT vs CSK : चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणाऱ्या दोन मराठी पोरांनी गुजरातला त्यांच्याच होम ग्राऊंडवर घाम फोडला होता. मात्र अखेरच्या षटकात गुजरातने चेन्नईचे 179 धावांचे आव्हान 5 विकेट्स आणि 4 चेंडू राखून पार करत IPL 2023 च्या हंगामाची विजयी सुरूवात केली. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने 50 चेंडूत 92 धावांची झुंजार खेळी केली. तर राजवर्धन हंगरगेकरने 4 षटकात 36 धावा देत 3 बळी टिपले. या दोन मराठमोळ्या खेळाडूंनी गुजरातचे तोंडचे पाणी पळवले होते. मात्र गिलने 63 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर मोक्याच्या क्षणी विजय शंकरने 22 धावांचे योगदान दिले आणि सामन्यावर पकड निर्माण केली.

तत्पूर्वी, आयपीएल 2023 च्या पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या ऋतुराज गायकवाडने 50 चेंडूत 92 धावा चोपल्या. त्याने 9 षटकार आणि 4 चौकार मारत 13 चेंडूतच 70 धावा ठोकल्या. मात्र चेन्नईच्या इतर फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही. दमदार सुरूवात करणाऱ्या चेन्नईच्या गुजरातने नंतर मुसक्या आवळल्या. चेन्नईने 20 षटकात 7 बाद 178 धावा करत गुजरातसमोर विजयासाठी 179 धावांचे आव्हान ठेवले. गुजरात टायटन्सकडून मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ आणि राशिद खान यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेत चांगला मारा केला.

राशिद खान अन् तेवतियाने विजय आणला खेचून 

राशिद खानने 3 चेंडूत 10 धावा तर राहुल तेवतियाने नाबाद 15 धावा करत शेवटच्या षटकात गुजरातला विजय मिळवून दिला.

156-5 : हंगरगेकरने दिला गुजरातला मोठा धक्का

चेन्नईकडून पदार्पण करणाऱ्या 20 वर्षाच्या हर्षवर्धन हंगरगेकरने विजय शंकरला 22 धावांवर बाद करत गुजरातला टेन्शन दिले.

138-4 : गिल बाद! तुषार देशपांडेने दिला सीएसकेला दिलासा

चेन्नईचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेने धोकादायक शुभमन गिलला 63 धावांवर बाद करत चेन्नईला मोक्याच्या क्षणी विकेट मिळवून दिली.

111-3 : जडेजाने गुजरातच्या कर्णधाराची केली दांडी गुल

चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार रविंद्र जडेजाने गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याचा 8 धावांवर त्रिफळा उडवत गुजरातला तिसरा धक्का दिला.

111-2 (12 Ov) : शुभमन गिलचे अर्धशतक

गुजरात टायटन्सचा सलामीवीर शुभमन गिलने 30 चेंडूत 50 धावांची खेळी करत संघाला 11 व्या षटकात शंभरी पार करून दिली.

93-2 (10 Ov) : राजवर्धन हंगरगेकरने दिले दोन धक्के

चेन्नई सुपर किंग्जने ठेवलेल्या 179 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरात जायंट्सने देखील आक्रमक सुरूवात केली. मात्र पदार्पण करणाऱ्या राजवर्धनने सलामीवीर वृद्धीमान साहाला 25 धावांवर बाद केले. त्यानंतर साई सुदर्शनने 17 चेंडूत 22 धावांची खेळी केली. मात्र त्याला देखील राजवर्धननेच बाद केले.

चेन्नईने केल्या 178 धावा

ऋतुराज गायकवाड 92 धावांवर बाद झाल्यानंतर आलेल्या इतर फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही. अखेर धोनीने शेवटच्या षटकात 13 धावा करत चेन्नईला 20 षटकात 7 बाद 178 धावांपर्यंत पोहचवले.

151-5  : ऋतुराजचे शतक हुकले

ऋतुराज गायकवाडने 50 चेंडूत 92 धावा चोपल्या. मात्र त्याने आपली बॅट बदलली आणि तो अल्झारी जोसेफच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याचे शतक अवघ्या 8 धावांनी हुकले.

149-4 (16.3 Ov) : चेन्नईची धावगती मंदावली

चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने आयपीएल 2023 च्या पहिल्याच सामन्यात मोठी खेळी करत आपला फॉर्म सिद्ध केला. मात्र दुसऱ्या बाजूने विकेट्स पडत गेल्यामुळे चेन्नईची धावगती 12 व्या षटकानंतर मंदावली.

CSK 114/3 (12) : ऋतुराजचा अर्धशतकी धडाका

चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने आयपीएल 2023 च्या पहिल्याच हंगामात दमदार अर्धशतकी खेळी करत संघाला 11 व्या षटकात शतक पार करून दिले. यात ऋतुराजचा 70 धावांचा वाटा होता.

51-2 (6 Ov) : पॉवर प्लेमध्येच चेन्नईला दोन धक्के

चेन्नई सुपर किंग्जला पॉवर प्लेमध्येच दोन धक्के बसले. सलामीवीर कॉन्वे 1 धाव करून बाद झाल्यानंतर आक्रमक खेळणारा मोईन अली देखील 17 चेंडूत 23 धावा करून राशिद खानची शिकार झाला.

ऋतुराजने केली षटकाराचे खाते उघडले. 

ऋतुराज गायकवाडने गुजरात टायटन्सचा कर्णदार हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. त्याने हंगामातील पहिला चौकार आणि पहिला षटकार देखील हार्दिक पांड्यालाच मारला.

14-1 : मोहम्मद शमीने हंगामातील विकेट्सचे उघडले खाते

गुजरात टायटन्सच्या मोहम्मद शमीने चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर डेवॉन कॉन्वेचा 1 धावेवर त्रिफळा उडवत चेन्नईला पहिला धक्का दिला. ही विकेट यंदाच्या हंगामातील पहिली विकेट ठरली.

ऋतुराजचा पहिला चौकार

आयपीएल 2023 च्या हंगामातील पहिला चौकार हा चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडच्या बॅटमधून आला.

चेन्नईकडून हंगरगेकर करणार पदार्पण 

चेन्नई सुपर किंग्जकडून महाराष्ट्राचा अष्टपैलू खेळाडू राजवर्धन हंगरगेकर आयपीएल पदार्पण करणार आहे.

हार्दिकने नाणेफेक जिंकली

हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. केन विलियमसन पहिल्या सामन्यात खेळणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com